शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात निम्यापेक्षा अधिक तरूण कैदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 05:00 IST

आता न्यायालयाच्या गतीमान कामकाजामुळे तसेच शासनाच्या नवीन निर्देशाने जिल्हा कारागृहातील कैद्यांची संख्या लक्षणीय कमी झालेली आहे. राज्यात उद्भवलेल्या कोरोना संसर्गामुळे किरकोळ गुन्ह्यातील कैद्यांना मुक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील राज्यातील कारागृहातील कैद्यांची संख्या कमी झाली आहे.  जिल्हा कारागृहात सध्या एकही महिला कैदी नाही. यासोबतच पॅरोलवर सहा कैद्यांना सोडण्यात आले.

ठळक मुद्देमहिला कैद्यांचे अल्प प्रमाण : गंभीर गुन्ह्यांच्या कैद्यांची नागपूर कारागृहात रवाणगी

संतोष जाधवरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वाढती बेरोजगारी, व्यसनाधीनतेचे प्रमाण यावरून झालेले वाद, शेतीच्या वादात गंभीर हल्ल्याचे प्रकरणे यासह बाल लैंगीक अत्याचारांतर्गत जिल्हा कारागृहात सध्या २५३ कैदी आहेत. यात निम्यापेक्षा अधिक कैदी तरूण आहेत. जिल्हा विभाजनानंतर गोंदिया येथे अद्यापही कारागृह नसल्याने तेथील कैदांनाही येथेच ठेवले जाते. आता न्यायालयाच्या गतीमान कामकाजामुळे तसेच शासनाच्या नवीन निर्देशाने जिल्हा कारागृहातील कैद्यांची संख्या लक्षणीय कमी झालेली आहे. राज्यात उद्भवलेल्या कोरोना संसर्गामुळे किरकोळ गुन्ह्यातील कैद्यांना मुक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील राज्यातील कारागृहातील कैद्यांची संख्या कमी झाली आहे.  जिल्हा कारागृहात सध्या एकही महिला कैदी नाही. यासोबतच पॅरोलवर सहा कैद्यांना सोडण्यात आले.  न्याधीन बंदीमध्ये १२८ पुरूष आणि तीन स्त्रीया असे १३१, शिक्षा झालेले दहा पुरूष स्थानबद्ध असलेला एक पुरूष आणि खूनाच्या प्रकरणात न्यायाधीन बंदी असलेले १०७ पुरूष आणि चार महिला असे १११ कैदी जिल्हा कारागृहात आहेत. महिला अत्याचार, खून आणि बाल लैगिंक अत्याचाराच्या घटनेतील आरोपींची संख्या असलेली दिसून येते आहे. जिल्हा कारागृहाची क्षमता १३८ पुरूष तर पाच स्त्रीयांची आहे. त्यातही सर्वाधिक कैदी गोंदिया जिल्ह्यातील आहेत. गंभीर गुन्ह्यातील कैद्यांना नागपूरला पाठविले जाते.

गोंदियातील कैद्यांचे प्रमाण अधिकजिल्हा विभाजनानंतर अद्यापही गोंदिया येथे कारागृह निर्माण करण्यात आले नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील कैदांना थेट भंडारा कारागृहात आणल्या जाते. येथे सर्वाधिक कैदी गोंदिया जिल्ह्यातील दिसून येतात. गोंदिया येथे कारागृह निर्माणाधीन आहे.

महिला कैद्यांचे प्रमाण नगन्यजिल्हा कारागृहात महिला कैद्यांची क्षमता पाच इतकी आहे. मात्र असे असले तरी महिलांचे प्रमाण सध्या नगन्य आहे. शिक्षा भोगत असलेली एकही महिला कैदी नाही तर सात न्यायाधीन बंदी महिला कारागृहात आहेत.

महिला अत्याचाराचे कैदी अधिकजिल्हा कारागृहात महिला अत्याचार, बाल लैगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील कैदी अधिक असल्याचे दिसून येत आहे.पैशाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करणे तसेच किरकोळ कारणावरून जीवे मारण्याची धमकी देणे असे दाखल झालेल्या आरोपींची संख्याही लक्षणीय आहे.खूनाच्या घटनातील कैद्यांची संख्याही मोठी दिसून येते. शेतीशी निगडीत वाद आणि पैशावरून झालेल्या वादातून आलेले कैदीही आहेत.

 

टॅग्स :jailतुरुंग