कारागृहात निम्यापेक्षा अधिक तरूण कैदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 05:00 IST2020-12-25T05:00:00+5:302020-12-25T05:00:57+5:30

आता न्यायालयाच्या गतीमान कामकाजामुळे तसेच शासनाच्या नवीन निर्देशाने जिल्हा कारागृहातील कैद्यांची संख्या लक्षणीय कमी झालेली आहे. राज्यात उद्भवलेल्या कोरोना संसर्गामुळे किरकोळ गुन्ह्यातील कैद्यांना मुक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील राज्यातील कारागृहातील कैद्यांची संख्या कमी झाली आहे.  जिल्हा कारागृहात सध्या एकही महिला कैदी नाही. यासोबतच पॅरोलवर सहा कैद्यांना सोडण्यात आले.

More than half the young inmates in the prison | कारागृहात निम्यापेक्षा अधिक तरूण कैदी

कारागृहात निम्यापेक्षा अधिक तरूण कैदी

ठळक मुद्देमहिला कैद्यांचे अल्प प्रमाण : गंभीर गुन्ह्यांच्या कैद्यांची नागपूर कारागृहात रवाणगी

संतोष जाधवर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वाढती बेरोजगारी, व्यसनाधीनतेचे प्रमाण यावरून झालेले वाद, शेतीच्या वादात गंभीर हल्ल्याचे प्रकरणे यासह बाल लैंगीक अत्याचारांतर्गत जिल्हा कारागृहात सध्या २५३ कैदी आहेत. यात निम्यापेक्षा अधिक कैदी तरूण आहेत. जिल्हा विभाजनानंतर गोंदिया येथे अद्यापही कारागृह नसल्याने तेथील कैदांनाही येथेच ठेवले जाते. 
आता न्यायालयाच्या गतीमान कामकाजामुळे तसेच शासनाच्या नवीन निर्देशाने जिल्हा कारागृहातील कैद्यांची संख्या लक्षणीय कमी झालेली आहे. राज्यात उद्भवलेल्या कोरोना संसर्गामुळे किरकोळ गुन्ह्यातील कैद्यांना मुक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील राज्यातील कारागृहातील कैद्यांची संख्या कमी झाली आहे.  जिल्हा कारागृहात सध्या एकही महिला कैदी नाही. यासोबतच पॅरोलवर सहा कैद्यांना सोडण्यात आले.  न्याधीन बंदीमध्ये १२८ पुरूष आणि तीन स्त्रीया असे १३१, शिक्षा झालेले दहा पुरूष स्थानबद्ध असलेला एक पुरूष आणि खूनाच्या प्रकरणात न्यायाधीन बंदी असलेले १०७ पुरूष आणि चार महिला असे १११ कैदी जिल्हा कारागृहात आहेत. महिला अत्याचार, खून आणि बाल लैगिंक अत्याचाराच्या घटनेतील आरोपींची संख्या असलेली दिसून येते आहे. जिल्हा कारागृहाची क्षमता १३८ पुरूष तर पाच स्त्रीयांची आहे. त्यातही सर्वाधिक कैदी गोंदिया जिल्ह्यातील आहेत. गंभीर गुन्ह्यातील कैद्यांना नागपूरला पाठविले जाते.

गोंदियातील कैद्यांचे प्रमाण अधिक
जिल्हा विभाजनानंतर अद्यापही गोंदिया येथे कारागृह निर्माण करण्यात आले नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील कैदांना थेट भंडारा कारागृहात आणल्या जाते. येथे सर्वाधिक कैदी गोंदिया जिल्ह्यातील दिसून येतात. गोंदिया येथे कारागृह निर्माणाधीन आहे.

महिला कैद्यांचे प्रमाण नगन्य
जिल्हा कारागृहात महिला कैद्यांची क्षमता पाच इतकी आहे. मात्र असे असले तरी महिलांचे प्रमाण सध्या नगन्य आहे. शिक्षा भोगत असलेली एकही महिला कैदी नाही तर सात न्यायाधीन बंदी महिला कारागृहात आहेत.

महिला अत्याचाराचे कैदी अधिक
जिल्हा कारागृहात महिला अत्याचार, बाल लैगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील कैदी अधिक असल्याचे दिसून येत आहे.
पैशाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करणे तसेच किरकोळ कारणावरून जीवे मारण्याची धमकी देणे असे दाखल झालेल्या आरोपींची संख्याही लक्षणीय आहे.
खूनाच्या घटनातील कैद्यांची संख्याही मोठी दिसून येते. शेतीशी निगडीत वाद आणि पैशावरून झालेल्या वादातून आलेले कैदीही आहेत.

 

Web Title: More than half the young inmates in the prison

टॅग्स :jailतुरुंग