मॉपड्रिल : रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. शहरात शांतता, सुव्यवस्था कशी कायम टिकून राहील. वाहतूक सुरळीत राहावी, याकरिता पोलीस विभागाचे अधिकारी, पोलीस, महिला पोलिसांनी जुन्या बसस्थानक परिसरात रंगीत तालीम केली. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांच्या नेतृत्वात मार्च पास्ट करण्यात आले. शहरातील मुख्य चौकात अचानकपणे पोलीस कर्मचारी धडकले. त्यांनी आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास जी स्थिती निर्माण होते. त्यावेळी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, याबाबत प्रत्यक्ष कवायत केली. आकस्मिक पोलीस वाहने व ताफा पाहून सर्व आश्चर्यचकित झाले. मात्र, कुठलाही अनर्थ नाही, तर उपाययोजनेची कर्तबगारी असल्याचे लक्षात येताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}