शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या लढाईत ग्रामीण भागातील माऊली सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

लॉकडाऊनच्या काळात आपल्या संसाराचा गाडा हाकत तालुक्यातल्या ग्रामीण भागातील माय-माऊली, भगिनी मास्कची निर्मिती करताना दिसत आहेत. सारे काही ठप्प असताना महाराष्ट्र शासनाची जिवनोन्नोती अभियान 'उमेद'च्या ५३ महिला समूहाच्या माध्यमातून लक्षावधी रूपयांची उलाढाल होताना दिसत आहे. कोरोनाशी दोन हात करण्यास बचत गट महत्त्वाची भूमिका तर बजावत आहेतच शिवाय, त्यांच्या हाताला देखील काम मिळाले आहे.

ठळक मुद्देगावागावात जनजागृती : 'उमेद'तर्फे मास्क व सॅनिटायझरची निर्मिती

राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोना आला आणि लॉकडाऊनची घोषणा झाली. केवळ चार तासात चित्र बदलले. आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मास्क, सॅनिटायझरला बाजारात मागणी वाढली. काहींनी तर यामध्ये देखील संधी शोधत काळाबाजारही केला. अव्वाच्या सव्वा भाव लावत आपली झोळी भरायला सुरूवात केली. मात्र मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा चा प्रश्न उभा ठाकला असताना ‘उमेद’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील माय माउलींनी मास्क तयार करत कोरोनाच्या या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
लॉकडाऊनच्या काळात आपल्या संसाराचा गाडा हाकत तालुक्यातल्या ग्रामीण भागातील माय-माऊली, भगिनी मास्कची निर्मिती करताना दिसत आहेत. सारे काही ठप्प असताना महाराष्ट्र शासनाची जिवनोन्नोती अभियान 'उमेद'च्या ५३ महिला समूहाच्या माध्यमातून लक्षावधी रूपयांची उलाढाल होताना दिसत आहे. कोरोनाशी दोन हात करण्यास बचत गट महत्त्वाची भूमिका तर बजावत आहेतच शिवाय, त्यांच्या हाताला देखील काम मिळाले आहे. या साº्या घडामोडींमध्ये आणि उलाढालींमध्ये जिल्ह्यात तुमसर तालुका अव्वल ठरला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाले आणि त्यानंतर मास्कची कमतरता भासू लागली. पण, या कठीण आणि कसोटीच्या काळात देखील 'उमेद'च्या ५३ समूह महिला सदस्यांनी तब्बल ५७०० मास्क तयार केले, तर ४५० सॅनिटायझरच्या बाटल्या तालुक्यातील सिहोरा परिसरातील सर्व औषधे दुकान, ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या माध्यमातून अगदी कमी किमतीत विक्री करण्यात आली आहे. शिवाय, अजूनदेखील हजारो मास्कची गरज असून ते देखील आगामी काळात उमेदच्या माध्यमातून पुरवली जाणार आहे. जिल्ह्यात मास्कची सक्ती करण्यात आली असली तरी मेडीकल स्टोर्समध्ये मास्क उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. मास्कचा तुटवडा लक्षात घेता नागरिक तोंडावर रुमाल बांधत आहेत. ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियाना अंतर्गत त्या माय माऊल्या गावागावांत फिरून रांगोळीच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करून नागरिकांनी घ्यावयाची दक्षता व स्वच्छतेविषयी माहिती देण्याचे कार्य पी. टी. बिसेन, महेश बडवाईक, सुरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWomenमहिला