शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीचा ‘प्रोजेक्ट ग्रीन’ परिसर झाला पुन्हा पडीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:16 IST

ओसाड आणि पडीक जमिनीचा विकास व्हावा यासाठी तत्कालीन तहसीलदार धनंजय देशमुख यांनी ‘प्रोजेक्ट ग्रीन’ संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. तहसील कार्यालयामागील परिसर हिरवागार झाला. मात्र त्यांचे मोहाडी येथून स्थानांतरण झाले आणि हिरवीगार झाडे करपली. प्रोजेक्ट ग्रीन परिसर पुन्हा पडीक अवस्थेत परावर्तीत झाला.

ठळक मुद्देसंवर्धनाला खिळ : उभी झाडे करपली, संबंधित विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : ओसाड आणि पडीक जमिनीचा विकास व्हावा यासाठी तत्कालीन तहसीलदार धनंजय देशमुख यांनी ‘प्रोजेक्ट ग्रीन’ संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. तहसील कार्यालयामागील परिसर हिरवागार झाला. मात्र त्यांचे मोहाडी येथून स्थानांतरण झाले आणि हिरवीगार झाडे करपली. प्रोजेक्ट ग्रीन परिसर पुन्हा पडीक अवस्थेत परावर्तीत झाला.मोहाडी तहसील कार्यालयामागील विस्तीर्ण जागा आहे. त्या जागेचे कुरण झाले होते. ओसाड आणि पडीक जागेकडे कुणाचेही लक्ष नव्हते. मात्र तत्कालीन तहसीलदार धनंजय देशमुख यांनी या परिसराचा कायापालट करण्याचा विडा उचलला. महसूल विभागातील अधिकारी- कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार, तलाठी तसेच लोकसहभागातून प्रोजेक्ट ग्रीन अस्तित्वात आणले. वृक्षांच्या संवर्धनासाठी तहसीलमधील हातपंपावर जेटपंप बसविण्यात आले. ड्रीप लाईन टाकून झाडांच्या मुळापर्यंत पाणी पोहचले. या ठिकाणी चिक्कू, आंबा, पेरू, अ‍ॅपल बोर, शेवगा आदी ४० प्रजातीची वृक्ष वाढू लागली. ओसाड जागेवर जणू नंदन फुलले. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी या प्रकल्पाची प्रशंसाच नाही तर तेथे येऊन वृक्षारोपण केले. शिक्षण आयुक्त धीरज कुमार, सचिव दीपक कपूर, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी भेटी दिल्या. या परिसरात जनावरे घेऊन जाणाऱ्यांना दंड होऊ लागला. त्यामुळे कुणीही तिकडे फिरकेना.मात्र तहसीलदार धनंजय देशमुख यांचे येथून स्थानांतरण झाले. त्यामुळे प्रोजेक्ट ग्रीनकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. आता वृक्ष संवर्धनासाठी लावलेले कठडे गवतात लपले आहेत. वृक्षही वाळत आहेत. काही ठिकाणचे कठडे तर चोरीला गेले आहेत. गत दीड वर्षात पुन्हा हा परिसर ओसाड दिसू लागला.पाण्याअभावी करपली झाडेशासन पर्यावरण संतुलनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करते. कोट्यवधी रुपयांचा त्यावर खर्चही करते. मात्र लोकसहभागातून येथे विकसीत झालेल्या प्रोजेक्ट ग्रीनकडे अल्पावधीतच दुर्लक्ष झाले. आता प्रशासनाच्या परिसरातील संवर्धित झाडे पाण्याअभावी करपू लागले आहेत. यापेक्षा दुर्देव ते कोणते याला जबाबदार कोण असा प्रश्न आहे.