शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीवासीयांना आता मिळणार मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

मोहाडी शहराची नळयोजना पूर्वीच्या लोकसंख्येनुसार सूर नदीवर तयार करण्यात आली. आता लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. परंतु दुसरा मार्ग नसल्याने त्यावरच तहान भागविली जात होती. त्यातच सूर नदी डिसेंबर महिन्यापासूनच कोरडी पडते. त्यामुळे नळ योजनेच्या विहिरीला पाणी उपलब्ध होत नाही. नागरिकांना दोन-तीन दिवसाआड पाणी मिळते.

ठळक मुद्देसूर नदीत बंधारा : नागरिकांची भटकंती थांबणार, नगरपंचायतीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : उन्हाळा आला की वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना मोहाडीकरांना करावा लागायचा. दोन - तीन दिवसाआड नळाला पाणी यायचे. पाण्यासाठी भटकंती करावी लागायची. मात्र नगरपंचायतीने आता मोहगाव देवी पुलाजवळ बंधारा बांधून हा पाणी प्रश्न सोडविला. पेंचचे पाणी त्यात अडविले जाणार असल्याने गुरवारपासून नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे.
मोहाडी शहराची नळयोजना पूर्वीच्या लोकसंख्येनुसार सूर नदीवर तयार करण्यात आली. आता लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. परंतु दुसरा मार्ग नसल्याने त्यावरच तहान भागविली जात होती. त्यातच सूर नदी डिसेंबर महिन्यापासूनच कोरडी पडते. त्यामुळे नळ योजनेच्या विहिरीला पाणी उपलब्ध होत नाही. नागरिकांना दोन-तीन दिवसाआड पाणी मिळते. यावर उपाय करण्यासाठी मोहाडी नगरपंचायतीने पेंच प्रकल्पाचे पाणी सूर नदीत सोडण्याची मागणी केली. नगराध्यक्ष गीता बोकडे व उपाध्यक्ष सुनील गिºहेपुंजे यांनी वारंवार पाठपुरावा केला. अखेर जिल्हा प्रशासन अधिकारी सुधीर गवळी यांनी लक्ष घातले आणि शेवटी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले. सदर पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला. यामुळे मोहाडीची पाणीटंचाई संपुष्टात येईल.

युद्धपातळीवर बांधला बंधारा
तीन दिवसापूर्वी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले. नगरपंचायतीला पत्र प्राप्त होताच युद्ध पातळीवर बंधारा बांधण्यात आला. १२ फुट उंच, २० फुट रुंद आणि २६० फुट लांब पाळीवर पॉलीथीन व ग्रीन शेड नेटचा वापर करून हा बंधारा बांधण्यात आला आहे.

टॅग्स :Waterपाणी