तीन लक्ष मतदार ठरविणार तुमसर क्षेत्राचा आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 06:00 AM2019-09-23T06:00:00+5:302019-09-23T06:00:33+5:30

पूर्व विदर्भातील धानाचे कोठार म्हणून तुमसर -मोहाडी तालुक्याची ओळख आहे. भंडारा- गोंदिया जिल्ह्यात सर्वात मोठी तांदळाची बाजारपेठ तुमसर शहरात आहे. या शहरातून दोन खासदार दिल्ली गेले. राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू म्हणून तुमसर शहराची ओळख आहे. संपन्नता लाभलेला परंतु विकासाकरिता तरसणारा असा हा मतदार संघ आहे.

The MLA of Tumsar constituency will decide three lakh voters | तीन लक्ष मतदार ठरविणार तुमसर क्षेत्राचा आमदार

तीन लक्ष मतदार ठरविणार तुमसर क्षेत्राचा आमदार

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्रातील चर्चेतील मतदार संघ : जातीय समीकरणानुसार उमेदवारीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर - मोहाडी विधानसभा मतदार संघात एकुण मतदारांची संख्या ३०१७३० असून पुरुष मतदार संख्या १५२७७९ व महिला मतदार १४८९५१ आहे. ३५६ मतदान केंद्रे आहेत. राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या तुमसर मतदार संघाला किंग ३०१७३० मतदार ठरविणार आहेत. या मतदार संघात तुमसर व मोहाडी तालुक्याचा समावेश आहे. सन २००९ मध्ये नव्याने मोहाडी तालुक्याचा समावेश तुमसर मतदार संघात करण्यात आला.
पूर्व विदर्भातील धानाचे कोठार म्हणून तुमसर -मोहाडी तालुक्याची ओळख आहे. भंडारा- गोंदिया जिल्ह्यात सर्वात मोठी तांदळाची बाजारपेठ तुमसर शहरात आहे. या शहरातून दोन खासदार दिल्ली गेले. राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू म्हणून तुमसर शहराची ओळख आहे. संपन्नता लाभलेला परंतु विकासाकरिता तरसणारा असा हा मतदार संघ आहे. भौगोलिकदृष्ट्या सर्वाधिक संपन्नता तुमसर मतदारसंघाला लाभली आहे.
वैनगंगा, बावनथडी नद्या, बावनथडी, सोंड्या सिंचन योजना मोठे तलाव येथे आहेत. परंतु येथील शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीत विशेष फरक पडला नाही. मॅग्नीजच्या जगप्रसिद्ध खाणी या तालुक्यात आहेत. परंतु सर्वसामान्यांना त्यांचा काहीच फायदा नाही. रेल्वे या मतदारसंघातून जाते. आंतरराज्यीय सीमा येथे भिडल्या आहेत. तुमसर- रामटेक नव्याने  राष्ट्रीय महामार्गाची घोषणा करण्यात आली.
सराफा बाजार हे दुसरे मोठे वैशिष्ट्ये तुमसरचे आहे. या मतदारसंघ जातीचे प्राबल्य दिसूनयेते. मागील २५ वर्षात येथे चार वेळा भाजपने बाजी मारली. तर सन २००९ मध्ये काँग्रेसचे अनिल बावनकर निवडून आले होते. १९९४ ते २००४ पर्यंत भाजपचे मधुकर कुकडे येथे विजयी झाले होते. २०१४ मध्ये भाजपचे चरण वाघमारे यांनी काँग्रेस - राकांकडून हा मतदार संघ हिसकावून घेतला. पुन्हा येथे भाजप- सेना व काँग्रेस- राका आघाडी अशी थेट लढत आहे.

मतदारांच्या संख्येत वाढ
तुमसर - मोहाडी मतदार संघात २३०० मतदारांची वाढ झाली आहे. सेनादलातील मतदारांची संख्या ७२६, दिव्यांग मतदार १२७४, बीएलओ संख्या ३५६, सावी मतदार केंद्र ०२, आदर्श मतदान केंद्र ०२, क्रिटीकल मतदान केंद्र ०३, क्षेत्रीक अधिकारी ३३ अशी नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: The MLA of Tumsar constituency will decide three lakh voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.