शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित पक्षी ‘पट्टकादंब’ भंडाऱ्यात मुक्कामी

By admin | Updated: February 24, 2016 00:37 IST

तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी परदेशी पाहुणे हजेरी लावतात.

हजारो किमीहून आलेले पक्षी परतीच्या मार्गावरभंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी परदेशी पाहुणे हजेरी लावतात. हिवाळा सुरु होताच परदेशात बर्फाचे आच्छादन पसरते व त्यामुळे या पक्ष्यांना त्यांचे भक्ष्य मिळणे कठीण होते. भक्ष्यांच्या शोधार्थ हे पक्षी हजारो किलोमीटरचे अंतर उडून भारतात येतात. भंडारा जिल्ह्यात यावर्षी दुर्मिळ परदेशी पाहुन्यांनी हजेरी लावली असून पट्टकादंब नावाचा दुर्मिळ पाहुण्याची भंडारा जिल्ह्यात नोंद झाली आहे. पट्टकादंब हा पक्षी भारतीय ‘हंसा’ सारखा असतो. त्याला सामान्यपणे ‘बार हेडेड गुस’ या नावाने ओळखले जाते. संस्कृतच्या वेदांमधील उल्लेखामुळे त्याला ‘कादंब’ हे नाव पडले. या पक्ष्याच्या डोक्यामागील काळ्या आडव्या खुणांमुळे त्याला ‘पट्ट’ हे नाव देण्यात आले. या पक्ष्यांचे मुख्य वास्तव्य कजाकिस्तान, तिब्बत, मंगोलिया आणि रूस असून ते भारतात हिमालय ओलांडून प्रवेश करतात. ‘पट्टकादंब’ हा जगातील सर्वात उंच उडणाऱ्या पक्ष्यांमधून एक असून तो मकालू पर्वतावरून उडत येतो. या पर्वताची उंची २७,८०० फुटांपेक्षाही जास्त आहे. माऊंट एवरेस्ट पर्वतावरून उडत आल्याचीही नोंद आहे. एवढ्या उंचीवरून उडताना त्याला हवेतील केवळ १० टक्के आॅक्सीजनची गरज असते. संपूर्ण हिवाळा महिना संपल्यावर या पक्ष्याचे केवळ भंडारा तालुक्यात दर्शन होणे म्हणजे पक्षीप्रेमींना पर्वणी ठरली आहे. पक्षीप्रेमी स्वप्निल वानखेडे, निलय नागदेवे, डॉ.स्वप्निल धारगावे या पक्षीप्रेमींना प्रथमत:च ‘पट्टकादंब’चे दर्शन झाले आहे. जानेवारी महिन्यात वरठीनजिकच्या पाचगाव तलावात आलेल्या स्थलांतरीत पक्ष्याची शिकार झाली होती. स्थलांतरीत पक्ष्यांची शिकार झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या दुर्मिळ पक्ष्याच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन जागेबद्दल गोपनीयता बाळगा, असे वनविभागाने सांगितल्याचे पक्षीप्रेमी स्वप्निल वानखेडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (शहर प्रतिनिधी)