शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांना भेटून स्वप्नवत वाटते

By admin | Updated: July 12, 2014 23:30 IST

लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरु झाली, तेव्हापासून नरेंद्र मोदी हे नाव आणि या नावाची व्यक्ती मी टिव्हीवर पाहात होतो. पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले, अन् त्यांचा टिव्हीवरचा वावर आणखी वाढला.

ग्रीन किडस्ने दिली संधी : नरेंद्र मोदींच्या भेटीने भारावला भंडाऱ्याचा आदित्य जोगी
भंडारा : लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरु झाली, तेव्हापासून नरेंद्र मोदी हे नाव आणि या नावाची व्यक्ती मी टिव्हीवर पाहात होतो. पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले, अन् त्यांचा टिव्हीवरचा वावर आणखी वाढला. तेव्हापासून या व्यक्तीप्रती एक वेगळेच आकर्षण वाटायला लागले. मात्र भविष्यात कधीही आपण त्यांना भेटू शकू, असे स्वप्नातही वाटले नाही. ‘लोकमत’च्या ग्रीन किड्स या स्पर्धेत विजयी झालो अन् ही संधी माझ्याकडे चालून आली. संसदेच्या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्यासमोर होते. अन् चक्क मराठीत विचारत होते, ‘कसे आहात तुम्ही?’ मला तर अजूनही तो क्षण स्वप्नासारखाच वाटतो, अशा भावना आपल्या शब्दात भंडाराच्या आदित्य अल्का जोगी या विद्यार्थ्याने ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.
ग्रीन किड्स या स्पर्धेत विजयी झालेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घालून देण्याचा उपक्रम ‘लोकमत’ने राबविला. मोदींच्या भेटीने भारावलेल्या या विद्यार्थ्यांना हवाई सफारीसह देशाच्या राजधानी दिल्लीतील विविध ठिकाणे पाहण्याची संधी मिळाली.
क्षणक्षणाला उत्सुकता
मोदी भेटीचे वर्णन करताना आदित्य म्हणाला, सकाळच्या सुमारास नागपुरच्या विमानतळावरून प्रवास सुरु होताच मनात घालमेल सुरु झाली. पंतप्रधानांना भेटल्यावर आपण काय बोलावे हा प्रश्न मनात सतत घोंगावत होता. एक तास ४२ मिनिटांचा प्रवास संपवून दिल्ली विमानतळावर पोहचल्यावर धाकधुक वाढली. क्षणाक्षणाला पंतप्रधानांच्या भेटीची उत्सुकता वाढत होती.
भव्य संसद अन् गर्दी
बसमध्ये आम्ही सर्व विजयी स्पर्धक व लोकमतच्या कर्मचाऱ्यांनी राजधानीतील विविध वास्तू दाखविले. इंडिया गेट, राष्ट्रपती भवन पाहिल्यावर संसदेत दाखल झालो. एवढी मोठी गोल व उंच इमारत पहिल्यांदाच पाहिली. संसदेत खूप लोक होते. आम्ही सर्व विद्यार्थी एका खोलीत दाखल झालो. काही वेळातच काही गार्ड आले. त्यांनी सर्व फेरफटका मारला. पंतप्रधानांनी अमूल्य वेळ काढून आमच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, मुलांनो खूप शिका, अभ्यास करा व मोठ्या पदावर पोहोचून देशाची सेवा करा. (प्रतिनिधी)