शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या उपचाराने विवाहितेचा गर्भपात

By admin | Updated: May 4, 2017 00:24 IST

तालुक्यातील नान्होरी दिघोरी येथील एका विवाहित महिलेच्या संमतीविना स्त्रीरोग तज्ञ नसलेल्या ..

नान्होरी येथील घटना : डॉक्टर, पती व सासूविरूद्ध पोलिसात तक्रारलाखनी : तालुक्यातील नान्होरी दिघोरी येथील एका विवाहित महिलेच्या संमतीविना स्त्रीरोग तज्ञ नसलेल्या आयुर्वेदिक डॉक्टराने पती व सासूच्या संगनमताने चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने त्या विवाहीतेचा गर्भपात झाला. संबंधीतावर कारवाईसाठी या आशयाची तक्रार खुद्द विवाहितेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. गोविंदा पाल रा. नान्होरी यांचा मुलगा दत्तू पाल याचा विवाह तीन वर्षापुर्वी भिकारमिन्सी येथील रहिवासी असलेल्या अरुण निरगुळे यांच्या कन्येशी झाला. विवाहानंतरचे काही दिवस आनंदात गेल्यानंतर त्यांना एक कन्या झाली. त्यानंतर सदर विवाहितेला माहेरून सोन्याची गोफ आणावी यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू झाले.विवाहितेला जानेवारी २०१७ मध्ये शारीरिक अशक्तपणा जाणवू लागला. त्यामुळे ७ मार्च रोजी सासूचे सांगण्यावरून महिलेच्या पतीने तिला मुरमाडी तुपकर येथील डॉ.जवंजार यांच्या क्लिनीकमध्ये नेले. होत असलेल्या त्रासाबाबत डॉक्टरला सांगितल्यावर आपण गरोदर असू शकता, याची चाचपणी करावी, असे सांगितले. औषधाच्या दुकानातून एक किट मागून गरोदरपणाची चाचणी केली असता दोन महिन्यांचा गर्भ असल्याचे निष्पन्न झाले. गर्भवती असल्याचे सांगून काही महिलेला औषधे दिली. घरी गेल्यावर जेवन झाल्यानंतर डॉक्टरानी दिलेल्या गोळया पतीने खाण्यास दिल्या. एकाच प्रकारच्या चारही गोळ्या असल्यामुळे मला संशय आला त्यामुळे मी औषध खाण्यास नकार दिला, असे पिडीत विवाहितेने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे केलेल्या तक्रारीत नमुद केले आहे. मात्र पतीने मारझोड करून जबरदस्तीने औषध खाण्यास बाध्य केले. तसेच औषध खाल्ल्यामुळे रक्तस्त्राव सुरू झाला. यातच महिलेचा गर्भपात झाला. चार दिवसानंतर याबाबत सदर महिला तक्रार देण्यासाठी लाखनी पोलिस ठाण्यात गेली असता बिट अंमलदाराने डॉक्टर व तिच्या पतीबरोबर भ्रमणध्वनीवरून संपर्क करून दोन महिन्याचा गर्भपात होवूच शकत नाही, असे पिडीतेला सांगून तक्रार घेण्यास नकार दिला. यामुळे डॉक्टर, विवाहितेचा पती यांच्यात आर्थिक देवाण-घेवाण होवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे पिडीत विवाहितेचे म्हणणे आहे. अत्याधिक रक्तस्त्राव झाल्याने पुन्हा शारीरिक कमजोरी वाटू लागल्याने घरची कामे करणे कठीण झाले. त्यामुळे सध्या ही महिला माहेरी राहत आहे. मला कसल्याही प्रकारची माहिती न देता चुकीच्या व सक्तीच्या उपचारामुळे माझा गर्भपात झाला आहे, व याची पोलीसात तक्रार होणार आहे, याची माहित डॉक्टरला होताच पिडीत महिलेच्या वडीलांशी मोबाईलवर संपर्क करून तथा महिलेच्या माहेरी येवून तक्रार न देण्यासाठी पैशाचे आमिष दाखविले., असा आरोपही पिडीतेने केला आहे. डॉक्टरांच्या चुकीच्या औषधोपचाराने गर्भपात झाल्याचे स्पष्ट होते. परिणामी सबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पिडीत महिलेने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. (शहर प्रतिनिधी) सदर विवाहित महिला माझ्याकडे पतीसह उपचारासाठी आली होती. अशक्तपणामुळे गरोदर असल्याची शंका आल्याने प्रेगनन्सी टेस्ट केली. महिला गर्भवती असल्याचे आढळून आले. मी तिच्यावर उपचार केला नाही. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात येण्याचा सल्ला दिला पण ती आली नाही.-डॉ. प्रमोद जवंजार. मुरमाडी