शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

महासमाधीभूमी महास्तुप येथे जनसागर उसळणार

By admin | Updated: February 7, 2015 23:19 IST

पत्र्त्रा मेत्ता संघ द्वारा निर्मित ऐतिहासिक, प्राचीन बुद्धनगरी पवनी पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदीच्या काठावरील भारतातील सर्वात मोठ्या भारत-जपानच्या मैत्रीचे

पवनी : पत्र्त्रा मेत्ता संघ द्वारा निर्मित ऐतिहासिक, प्राचीन बुद्धनगरी पवनी पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदीच्या काठावरील भारतातील सर्वात मोठ्या भारत-जपानच्या मैत्रीचे प्रतीक ठरलेल्या रूयाड सिंदपुरी येथील महासमाधीभूमी महास्तुपाला ८ वर्ष पुर्ण होत आहेत. त्या निमित्ताने येथे आज ८ फेब्रुवारीला धम्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या धम्मोत्सवात सहभागी होण्याकरीता देश विदेशातील बौद्ध भिक्कु येणार असून लाखोंचा जनसागर उसळणार आहे.धम्मदुत भदंत संघरत्न मानके यांच्या अथक प्रयत्नाने महासमाधी भूमी महास्तुपाची निर्मिती करण्यात आली आहे. हा महास्तुप भारताच्या स्थापत्य क्षेत्रात नावीन्यपूर्ण ठरला आहे. ऐतिहासिक प्राचीन पवनी नगरी पुर्वी बुद्ध धर्माच्या प्रसाराचे मुख्य केंद्र होती. येथे सम्राट अशोकाच्या काळातील भारतातील सर्वात मोठा बौद्ध महास्तुप सापडला आहे. येथे आजही बुद्धकालीन अवशेष सापडतात. पण काळाच्या ओघात येथील बुद्ध धर्माचे प्रसार केंद्रही बंद झाले. ऐतिहासीक पवनी नगरीला आपली प्राचीन, सांस्कृतीक प्रतिष्ठा परत मिळवून देण्याच्या उद्देशाने भदंत संघरत्न मानके यांच्या दुरदृष्टीतून २८ वर्षा अगोदर रूयाड सिंदपुरी येथे भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय स्तराचा महास्तुप निर्माण करण्याचे ठरविले गेले. हा निर्णय बौद्ध धर्माच्या दृष्टीने पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरला आहे. या महास्तुपात स्थापित केलेल्या प्रतिमांना महत्वपूर्ण इतिहास आहे. तथागत सम्यक संबुद्धाची १८ फुट उंच प्रतिमा स्थापित करण्याकरीता वाराणसी पासून ४० कि़मी. अंतरावरील चुनारगड येथून दगड आणला गेला. या दगडापासून सम्राट अशोकाने २ हजार ३०० वर्षांपुर्वी ८४ हजार स्तुपाची निर्मिती केली. या दगडाचा उपयोग या महास्तुपातील बुद्ध प्रतिमा तयार करण्याकरीता करण्यात आला. ही प्रतिमा बनविणारे ही त्याच वंशाचे आहेत. या स्तुपात एकाचवेळी दोन हजार उपासक ध्यान साधनेसाठी बसू शकतात. हा महास्तुप पवनी तालुक्याच्या पर्यटन विकासात महत्वपूर्ण ठरलेला आहे. या स्तुपामुळे पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. या महास्तुपात दररोज मोठ्या संख्येन देश विदेशातील पर्यटक, बौद्ध उपासक येत आहेत. हा महास्तुप आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर आज भव्य धम्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन तेंदाई संघ जपानचे शोतायू योका यांच्या हस्ते भदंत संघरत्न मानके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)