शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
5
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
6
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
8
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
9
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
10
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
11
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
12
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
13
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
14
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
15
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
16
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
17
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
18
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
19
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
20
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेश सीमा प्रवेश बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:01 IST

राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका थांबविण्यासाठी जिल्हा सीमेलगत असणाऱ्या बपेरा गावाशेजारील मोवाड आंतरराज्यीय सीमा बालाघाट जिल्हा प्रशासनाने बंद केली आहे. येथून जाणाऱ्या विविध चारचाकी व दुचाकी वाहनांची पोलीस कसून तपासणी करीत आहेत. मध्यप्रदेश राज्यातील अनेक मजूर रोजगाराच्या निमीत्ताने महाराष्ट्र राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे येतात. मात्र सध्या कारोना संसर्गाच्या भितीने सर्व मजूर आपल्या मूळ गावी परतत असल्याने या मजुरांना आरोग्य तपासणीला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देखासगी प्रवासी वाहतूक बंद : कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका थांबविण्यासाठी जिल्हा सीमेलगत असणाऱ्या बपेरा गावाशेजारील मोवाड आंतरराज्यीय सीमा बालाघाट जिल्हा प्रशासनाने बंद केली आहे. येथून जाणाऱ्या विविध चारचाकी व दुचाकी वाहनांची पोलीस कसून तपासणी करीत आहेत.
मध्यप्रदेश राज्यातील अनेक मजूर रोजगाराच्या निमीत्ताने महाराष्ट्र राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे येतात. मात्र सध्या कारोना संसर्गाच्या भितीने सर्व मजूर आपल्या मूळ गावी परतत असल्याने या मजुरांना आरोग्य तपासणीला सामोरे जावे लागत आहे. मध्यप्रदेशातील मजूर मिळेल त्या वाहनाने नागपूर, भंडारा, तुमसर येथून मध्यप्रदेशकडे रवाना होताना दिसून येत आहेत. काही जण वाहने मिळत नसल्याने तुमसर बपेरा राज्यमार्गावरुन १८ किमी अंतर पायी जाताना दिसून आले. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे सिहोरा येथील गावकरी जिल्ह्याबाहेरून आलेल्या मजुरांना पाहून भीती व्यक्त करीत आहेत. गावातील सरपंचांना याबाबत तात्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने या मजुरांची चौकशी करून त्यांना पुढील प्रवासासाठी सहकार्य करण्यात आले. मात्र यातील अनेक नागरिकांची माहिती होत नसल्याने प्रशासन देखील अनभिज्ञ राहत आहेत.
बाहेरील नागरिकांची प्रशासनाला नोंद ठेवण्यामध्ये अडचणी येत आहेत. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्हा प्रशासनाने मोवाड आंतरराज्य सीमेवर नागरिकांना सीमाबंदी केली आहे.
सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प धरणमार्ग सील करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. मध्यप्रदेश सरकारने आंतरराज्य सीमाबंदी केली मात्र भंडारा जिल्ह्यातील बपेरा आंतरराज्यीय सीमेवर पोलीसांकडून कोणतीही चौकशी करण्यात येत नाही.
पोलीस प्रशासनाकडून कोणतीही चौकशी होत नसल्याने बपेरा सीमा मोकाटच दिसून येत आहे. त्यामुळे येथून कोरोना संसर्ग झालेल्या आंतरराज्यीय रुग्ण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिहोरा परिसरातील नागरिकांकडून बपेरा सीमेवरून येणाºया नागरिकांची तपासणी करण्याची मागणी होत आहे. आठवडी बाजार बंद करण्यात आल्यानंतर भाजीपाल्याची टंचाई जाणवत असल्याने परिसरात भाजीपाला खरेदी करिता अनेकजण शेतकऱ्यांच्या थेट शेतावर पोहचत आहेत.

कामे थांबल्याने मजूरवर्ग त्रस्त
तालुक्यात रोजगाराच्या संधी नसल्याने अनेकांचे उत्पन्न खालावले आहे. त्यातच कोरोना विषाणूचा संसर्गाने अनेकांना गत काही दिवसांपासून काम मिळालेले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकºयांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत अनेकांनी कामे थांबविली आहेत. याचा फटका परिसरातील मजूर वर्गाला बसत असल्याचे काही मजुरांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या