शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर वनवृत्तात भंडाऱ्यात सर्वात कमी आगीच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 05:00 IST

भंडारा वनविभागात दहा वनक्षेत्र, ३८ सहवनक्षेत्र आणि १५६ बिटांची संख्या आहे. जिल्ह्यात राखीव वन ५४७.१२९ चौरस किमी., संरक्षित वन २७७.७६७ चौरस किमी., झुडूपी जंगल ९९.६५४ चौरस किमी. आणि अवर्गकृत क्षेत्र ४.५१७ चौरस किमी आहे. जंगलात बहुमूल्य वनसंपदा आणि विविध प्रकारचे पशुपक्षी आहेत. वनाचे रक्षण करण्यासाठी वनविभागाची यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहे. मात्र असले तरी जंगलात आगी लागण्याच्या घटना घडतात.

ठळक मुद्देवणवा हंगामाला प्रारंभ : फायर लाईनचे काम झाले पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कळत न कळत होणाऱ्या चुकांमुळे जंगलात वणवा लागतो. कोट्यवधीची बहुमूल्य वनसंपदा नष्ट होते. शेकडो पशुपक्षी आगीत होरपळून निघतात. हा प्रकार टाळण्यासाठी भंडारा वनविभागाने गत काही वर्षांपासून विशेष मोहीम हाती घेतली. त्यामुळेच नागपूर वनवृत्तात जिल्ह्यात सर्वात कमी आगीच्या घटना घडल्या. दरम्यान यावर्षीच्या वणवा हंगामाला प्रारंभ झाला असून जंगलातील फायरलाईनचे काम पूर्ण झाले आहे.भंडारा वनविभागात दहा वनक्षेत्र, ३८ सहवनक्षेत्र आणि १५६ बिटांची संख्या आहे. जिल्ह्यात राखीव वन ५४७.१२९ चौरस किमी., संरक्षित वन २७७.७६७ चौरस किमी., झुडूपी जंगल ९९.६५४ चौरस किमी. आणि अवर्गकृत क्षेत्र ४.५१७ चौरस किमी आहे. जंगलात बहुमूल्य वनसंपदा आणि विविध प्रकारचे पशुपक्षी आहेत. वनाचे रक्षण करण्यासाठी वनविभागाची यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहे. मात्र असले तरी जंगलात आगी लागण्याच्या घटना घडतात. कृत्रिम वणवा लागून शेकडो हेक्टरवरील जंगल नष्ट होते. अनेक पशुपक्षी त्यात होरपळले जातात. मात्र भंडारा वनविभागाने वणवा नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविली. त्यामुळेच गत काही वर्षात भंडारा जिल्ह्यातील जंगलात आगीच्या केवळ चार घटना घडल्या. या नागपूर वनवृत्तात सर्वात कमी आहे. उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यामुळे प्रचंड नुकसान होते. वनक्षेत्रालगत असलेल्या शेतांमध्ये कचरा पेटवून दिला जातो. त्यामुळे आग लागण्याची भीती असते. जंगलातील मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी आग लावली जाते. मोहफूल गोळा करण्यासाठी परिसरातील केरकचरा जाळला जातो. तेंदूपत्ता संग्रहात सिमांकीत वाढ होण्यासाठी स्थानिकांकडून जाणीवपूर्वक वनक्षेत्रात आगी लावल्या जातात. तसेच जळती बिडी शिगारेट फेकल्यानेही आगी लागण्याची शक्यता असते. हा प्रकार टाळण्यासाठी भंडारा वनविभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. वन कर्मचाऱ्यांना जागते रहो चे आदेश देण्यात आले आहे. १५ फेब्रुवारी ते १५ जून हा वणवा हंगाम असून तत्पूर्वी जंगलातील फायर लाईनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. 

कृत्रिम वणवा लावल्यास कठोर कारवाई

राखीव वणात आग लावल्यास, विस्तोव पेटविल्यास लागलेल्या आग प्रकरणात संबंधितावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश भंडाराचे उपवनसंरक्षक एस.बी. भलावी यांनी दिले आहे. कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. कृत्रिम वणवा लावणाऱ्यास एक वर्षापर्यंत कारावास किंवा पाच हजार रुपयापर्यंत दंड किंवा दोनही शिक्षा ठोठावली जावू शकते.

वणव्याचे गांर्भीय लक्षात घेवून योजना कार्यांन्वीत केली आहे. कर्मचाऱ्यांना जागते रहोच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियंत्रणासाठी आवश्यक निर्देश दिले आहेत. वनक्षेत्राशी संबंधीत वनप्रेमी व नागरिकांनी आग लागल्याचे दिसताच तात्काळ नजीकच्या वनकर्मचाऱ्यांना माहिती द्यावी.-शिवराम भलावी, उपवनसंक्षक भंडारा.

 

टॅग्स :forestजंगलfireआग