शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर, मोहाडी, पवनीत शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे तुमसर, मोहाडी, पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी धानपीक आडवे झाले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : पीक नुकसानीचा सर्वे करुन आर्थिक मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यावर्षी पावसाची संततधार कायम राहिल्याने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आनंदीत होता. मात्र सद्यस्थितीत धान गर्भावस्थेत असल्याने तसेच हलक्या व मध्यम प्रतीचे वाण परिपक्व झाल्याने काही ठिकाणी धान कापणीला सुरुवात झाली होती. परंतु दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे तुमसर, मोहाडी, पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी धानपीक आडवे झाले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.तुमसर तालुक्यातील रोंघा, मंगरली, लोहारा, गायमुख, रामपूर यासारख्या इतरही गावांमध्ये १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या वादळी पावसामुळे धानपीक जमीनदोस्त झाले आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी कृषी विभागासह महसूल विभागाने वेळीच दखल घेऊन नुकसानग्रस्त धानपीकांचे प्रत्यक्ष मोका पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.गत आठवड्याभरापासून वातावरण ढगाळ राहत असल्याने तूर पीकालाही फटका बसत आहे. किडींचा प्रादूर्भाव वाढत असून निसर्गाच्या फटक्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी भेटी देत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार करूनही अनेक ठिकाणी अद्याप पंचनामे झालेले नाहीत. त्यातच अनेक शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदवूनही अनेकांना याचा लाभ मिळत नसल्याने योजनेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. दरवर्षीच येणाऱ्या गारपीट, चक्रीवादळ तसेच तडाख्याच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही पीक विमा योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे संतप्त शेतकरी कृषी विभागाकडे चकरा मारत आहेत. मात्र याची अंमलबजावणी जिल्हा राज्य पातळीवरून होत असल्याने अद्यापही अनेक ठिकाणी शेतकरी या योजनेत पात्र ठरलेले नाही. अनेक ठिकाणी भातपीक आडवे झाले आहे. पडलेल्या भातपीकामुळे हे सडण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे हलके व मध्यम प्रतीचे कापणीयोग्य झालेले धान डोळ्यादेखत सडत असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे.रबी हंगामही लांबणीवर

अनेक ठिकाणी झालेल्या पावसामुळे तसेच धानपीक निघण्यासाठी उशीर असल्याने शेतकऱ्यांना रबी हंगामासाठी उशीर होत आहे. काही ठिकाणी सोयाबीन पीक निघाले असले तरी अद्याप मशागत न झाल्याने शेतकºयांना गहू, हरभरा पिकाच्या पेरणीसाठी शेताची मशागत करता आलेली नाही. त्यामुळे रबी हंगामातील पिकांच्या पेरणीला उशीर होणार असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी