शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदीच्या बहिष्काराने शेतकऱ्यांचेच नुकसान

By admin | Updated: November 12, 2014 22:39 IST

अत्यल्प कमिशनवर धान खरेदी केंद्र चालवून केंद्र व राज्य शासनाला सहकार्य करणाऱ्या तालुका स्तरीय खरेदी-विक्री सहकारी संस्था अत्याधिक डबघाईस आल्या असून या पुर्वीच्या आघाडी सरकारने

साकोली : अत्यल्प कमिशनवर धान खरेदी केंद्र चालवून केंद्र व राज्य शासनाला सहकार्य करणाऱ्या तालुका स्तरीय खरेदी-विक्री सहकारी संस्था अत्याधिक डबघाईस आल्या असून या पुर्वीच्या आघाडी सरकारने या संस्थाचे अस्तीत्व धोक्यात आणले आहे. हे आता स्पष्टपणे उघड झाले आहे. वर्ष २००९ पासुन शासनाने सहकारी संस्थाना त्यांचे कमीशन, गोदाम भाडे, हमाली खर्च तसेच सहित्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे या संस्थाच बंद होण्याच्या मार्गावर असून यावर्षी साकोली तालुक्यात धान खरेदी करणार नाही अशी भुमिका श्रीराम सहकारी भातगिरणी साकोली यांनी घेतली आहे. त्यामुळे शासनाच्या जांचक अटीचा त्रास शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.केंद्र सरकारची आधारभूत खरेदी केंद्राची योजना राज्य शासनामार्फत पणन महामंडळाच्या वतीने कार्यान्वित केली जाते. पणन महामंडळाकडे स्वत:ची यंत्रणा नसल्याने तालुका खरेदीविक्री सहकारी संस्थाच्या मदतीने खरेदी केंद्र कार्यान्वित केली जाते. यासाठी संस्थाना २ टक्के कमीशन, गोदाम भाडे, हमाली खर्च व इतर साहित्याचा खर्च देण्याची तरतुद आहे. खरेदी केंद्र चालविणाऱ्या या संस्थेकउे पुरेसे गोदाम नसल्याने ते खाजगी गोदाम भाड्याने घेतात. दरम्यान मागील पाच वर्षापासुन राज्यशासनाने संस्थाचे कमीशन, गोदाम भाडे आणि अन्य रक्कमेचे चुकारेच देण्यात आली नाही उलट साठवून ठेवण्यात आलेल्या धानात तुट आल्याचे कारण पुढे करीत संस्थाकडून मोठी कपात करण्यात येते.यासंदर्भात श्रीराम सहकारी भातगिरणी सहकारी संस्था साकोली येथे चौकशी केली असता. मिळालेल्या माहितीनुसार या संस्थेने सन २००९-१० ला ६२ हजार ९४६ क्विंटल, सन २०१०-११ ला २७ हजार ८१ क्विंटल, सन २०११-१२ ला ६० हजार १०६ क्विंटल, सन २०१२-१३ ला ६१ हजार ७३० क्विंटल, सन २०१३-१४ ला ३३ हजार ९६६ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. या धान खरेदीसाठी शासनाने शेतकऱ्यांना १९ कोटी ३८ लाख ४ हजार २५८ रुपये दिले.धान खरेदी नंतर शासनाने हा धान दोन महिन्यात तर उचल करावा. मात्र शासनातर्फे हा धान दोनदोन वर्ष उचलच करण्यात आल नाही. परिणामी धानात कमालीची घट आली. यानंतर सन २००९-१० पासुनचे या संस्थेचे आतापर्यंत कमीशनची एकुण रक्कम ही ४१ लक्ष रुपये एवढी झाली पैकी शासनाने त्यांना फक्त ४ लक्ष रुपये दीले असून गोडाऊन भाडे जवळपास २० लक्ष रुपये एवढे झाले मात्र शासनाने ही रक्कम अजुनपर्यंत अदा केली नसल्यामुळे यावर्षी ही संस्था धान खरेदी करण्यास तयार नाही. जोपर्यंत धान खरेदी केंद्र सुरु करणार नाही अशी भूमिका या संस्थेने घेतली आहे. शासनाच्या या कढोरपनाचा त्रास मात्र शेतकऱ्यांना भोगावा लागत असून शेतकरी आपला धान खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात विकत आहेत. (तालुका प्रतिनिधी)