शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST

गावकऱ्यांच्या चर्चेनुसार ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात तसेच अंतर्गत नाराजीतून त्यांनी ग्रामपंचायत फाटकाला कुलूप लावल्याची बोलले जात आहे. गावात अनेकदा ग्रामपंचायत बंदच राहते. त्याचा नाहक त्रास गावातील नागरिकांना होत असतो. शासकीय योजनांसाठी सरपंच तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामपंचायत हॉल उपलब्ध करुन दिला जात नाही.

ठळक मुद्देखरबी येथील प्रकार : ग्रामपंचायत कारभाराविरूद्ध नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कखरबी (नाका) : भंडारा तालुक्यातील खरबी नाका येथे ग्रामपंचायत सदस्य सुधीरकुमार मस्के यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्रामपंचायतच्या फाटकाला कुलूप ठोकले. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.गावकऱ्यांच्या चर्चेनुसार ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात तसेच अंतर्गत नाराजीतून त्यांनी ग्रामपंचायत फाटकाला कुलूप लावल्याची बोलले जात आहे. गावात अनेकदा ग्रामपंचायत बंदच राहते. त्याचा नाहक त्रास गावातील नागरिकांना होत असतो. शासकीय योजनांसाठी सरपंच तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामपंचायत हॉल उपलब्ध करुन दिला जात नाही. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून गावकऱ्यांचा तसेच महिलांचा विकास करण्यासाठी पंचायत समितीमार्फत अभियान राबविले जात आहे. मात्र यासाठीही ग्रामपचांयतकडून हॉल मिळत नसल्याची ओरड होत आहे. ग्रामपंचायत गावकºयांच्या विकासासाठी का? पदाधिकाऱ्यांच्या हितासाठी अशा चर्चेला गावात उत आला आहे. ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात गावात नाराजीचा सुर उमटत आहे. यातूनच फाटकाला कुलूप ठोकले असल्याची चर्चा गावात रंगत आहे. याबाबत मस्के यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही. गावातील महिला सरपंच रत्नमाला वाडीभस्मे यांनी सुधीरकुमार मस्के यांच्याशी संपर्क साधून भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अन्य कोणत्याही सदस्यांच्यादेखील ते संपर्कात नसल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.नागरिक संतप्तसरकारने ग्रामपंचायत मार्फत गावाचा विकास करण्याचे ठरविले असले तरीही ग्रामपंचायतमार्फत अनेक कामासाठी अडथळा निर्माण होत असल्याने गावकºयांमधून संतप्त वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत