शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

पाणी साठवण क्षमता असलेला लाखांदूर तालुका कोरडा

By admin | Updated: February 29, 2016 00:18 IST

तालुक्यात सिंचनाची साधने पुरेपूर असली तरी पाणी अडवून पाणी साठवण क्षमता भक्कम करण्यासाठी सर्व यंत्रणेने करोडोच्या घरात निधी खर्च केला.

निधी खर्च : उन्हाळ्यात निर्माण होईल पाण्याची टंचाईलाखांदूर : तालुक्यात सिंचनाची साधने पुरेपूर असली तरी पाणी अडवून पाणी साठवण क्षमता भक्कम करण्यासाठी सर्व यंत्रणेने करोडोच्या घरात निधी खर्च केला. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी साठवण क्षमता असलेले सर्व साधनात आज थेंब पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना भिषण पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.पाणी अडवा, पाणी जिरवा हे म्हणणे सोपे आहे. जितकेच प्रशासनाचा अधिकाऱ्यांना व यंत्रणेनी पाण्याची तीव्र टंचाई भासवून अपयश पदरी पाडले आहे. तालुक्यातील सर्वच यंत्रणेचा माध्यमातून शेततळे सिमेंट नाला बांधकाम, बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. वनविभागाच्यावतीने मागील तीन वर्षापासून लाखो रुपयाची वनतलाव, बंधारे बांधण्यात झाली. पाणी अडवून गिरविणे हा मुख्य उद्योग असला तरी वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी व पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, मात्र लाखो रुपये खर्च करूनही उन्हाळ्यात तर थेंब न थेंब पाण्याचा ठणठणाट असतोच. पावसाळ्यात पाणी अडविल्या जात नाही. त्यामुळे हे वनतलाव निरर्थक ठरले आहेत. तालुका कृषी कार्यालयामार्फत मागणीनुसार शेतकऱ्यांना शेती व्यवसायाला सिंचनाचा आधार व्हावा म्हणून शेततळे बांधण्यात आले. नाही तर अर्धवट बांधकाम झालेल्या शेततळ्यांची संख्या जास्त दिसून येते. याकरिता सुद्धा शासनाचा लाखोचा निधी खर्च करण्यात आला. तर अनेक शेतकऱ्यांना खर्च केलेली रक्कम अर्धवट बांधकामामुळे अडून आहे. सद्यस्थितीत बहुतांश शेततळे कोरडे आहेत. त्यामुळे पाण्याची पानही वाढणे गरजेचे असतानी या अनेक कारणामुळे खोलवर गेलेली आहे. निधी खर्च मात्र शेततळ्यात पाण्याचा ठणठणाट म्हटल्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय उरला नाही.जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात विक्रमी सिमेंट नाला बांधकाम हाती घेण्यात आले. यासाठी कोट्यावधीचा निधी खर्च करण्यात आला. ही योजना शेतकऱ्यांना वरदान ठरणारी आहे. पाणी अडवून त्या पाण्याचा वापर सिंचनाकरिता व्हावा हा त्यामागचा मुख्य उद्देश फोल ठरला आहे. निकृष्ट बांधकामामुळे पाणी अडवता आले नाही. बंधाऱ्यांना भगदाड असल्याने पाणी सरळ वाहून गेले. अन् बांधारे कोरडे राहिले. चालू वर्षातील संपूर्ण बंधारे, वनतलाव, शेततळ्यांची चौकशी केल्यास कोट्यावधीची निधी, पाणी साठवण साधनासाठी व्यर्थ गेल्याचा निष्कर्ष घरी लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे यंदा पाण्याची तीव्र टंचाई नक्कीच जाणवणार असून आतापासून तालुक्यातील अनेक गावातील नळयोजना बंद पडल्या आहे. (तालुका प्रतिनिधी)