शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
3
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
4
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
5
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
6
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
7
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
8
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
11
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
12
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
13
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
14
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
15
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
19
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
20
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
Daily Top 2Weekly Top 5

लाखनीत अवैध प्रवासी वाहनांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 01:10 IST

तालुक्याचे मुख्यालय असलेल्या लाखनी शहरातील रस्त्यांना सध्या अवैध प्रवासी वाहनांचा विळखा पडला आहे. प्रत्येक रस्त्यावर अवैध प्रवासी वाहनांचा गोंधळ सुरू असतो. साकोली तालुक्यातील कुंभली येथील अपघातानंतरही येथील अवैध प्रवासी वाहतुकीवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

ठळक मुद्देपोलिसांचे दुर्लक्ष : कुंभली येथील अपघातानंतरही कोणतीच कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या लाखनी शहरातील रस्त्यांना सध्या अवैध प्रवासी वाहनांचा विळखा पडला आहे. प्रत्येक रस्त्यावर अवैध प्रवासी वाहनांचा गोंधळ सुरू असतो. साकोली तालुक्यातील कुंभली येथील अपघातानंतरही येथील अवैध प्रवासी वाहतुकीवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. यामुळे वाहतुकदारांचे मनोबल वाढले असून अपघाताची भीती आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर लाखनी शहर व उपनगर असलेले मुरमाडी (सावरी) वसलेले आहे. दोन्ही गावांची लोकसंख्या २० हजाराच्या आसपास आहे. तसेच परिसरातील दीडशे पेक्षा अधिक गावांची लाखनी बाजारपेठ आहे. त्यामुळे येथे नेहमी वर्दळ असते. अशा वर्दळीच्या रस्त्यावर सध्या अवैध प्रवासी वाहनांचा धुमाकूळ सुरू आहे. तहसील कार्यालयाजवळील समर्थनगर ते बसस्थानक, बाजार चौक, मुख्य बसस्थानक याठिकाणी काळी-पिवळी वाहने उभी असतात. सध्या लाखनी शहरात राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे आधीच येथे वाहतूक जीवघेणी झाली आहे. त्यातच अवैध प्रवासी वाहतुकदारांच्या मनमानी सुरू आहे.साकोली तालुक्यातील कुंभली येथील चुलबंद नदीच्या पुलावरून काळी-पिवळी जीव कोसळून सहा निष्पाक जीवांचा बळी गेला होता. त्यानंतर दोन दिवस लाखनी येथील वाहतूक काही प्रमाणात नियंत्रणात आली होती. परंतु पुन्हा पोलिसांच्या आशिर्वादाने ही वाहतूक सुरू आहे. लाखनी ते सालेभाटा, निलागोंदी, केसलवाडा-पवार, पालांदूर चौ., मुरमाडी तुप., साकोली, भंडारा अशी वाहतूक जोमात सुरू आहे.आॅटोरिक्षा चालकांची मरमानीतहसील कार्याल्यासमोर असलेल्या समर्थनगर बसथांब्यावर दिवसभर आॅटोरिक्षा उभे असतात. त्याठिकाणी साधारण व जलद बसेस थांबतात. त्यांच्यासमोर आॅटोरिक्षा, काळी-पिवळी वाहने उभी असतात. त्यामुळे बस थांब्यावर थांबल्यानंतर प्रवाशांना बसच्या मागे धावावे लागते. याठिकाणी समर्थ विद्यालय, गांधी विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, समर्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गर्दी असते. एकीकडे उड्डाणपूलाचे बांधकाम आणि दुसरीकडे अवैध वाहनांची गर्दी असे दृश्य असते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी