खरिपाचा धान केंद्रातच पडून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 AM2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:01:04+5:30

भंडारा जिल्ह्यात सुमारे ३२ लक्ष १० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली. ८९ धान खरेदी केंद्र अंतर्गत जिल्ह्यातील धान खरेदी केल्या गेली. खरेदीच्या तुलनेत डीओच्या माध्यमाने धानाची भरडाईसाठी उचल होऊ न शकली नाही. त्यामुळे गोदाम व त्याच्या बाहेर धान पडून आहेत. काही ठिकाणचे धान बाहेरचे उचलल्या गेले तर काहींचे गोदामात अर्ध्याच्यावर शिल्लक आहेत.

Kharif paddy falls in the center! | खरिपाचा धान केंद्रातच पडून!

खरिपाचा धान केंद्रातच पडून!

Next
ठळक मुद्देउन्हाळीची खरेदी अशक्यच : नोव्हेंबर महिन्यापासून खरिपाचा धान आजही गोदामातच

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील हमी धान खरेदी केंद्र उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी असक्षम दिसत आहेत. गोदामाची व्यवस्था अपुरी असल्याने व खरिपातील धान आजही गोडाऊनमध्ये पडला असल्याने पुढची खरेदी प्रभावित झालेली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
पालांदूर परिसरात पालांदूर, मेंगापूर, जेवनाळा, देवरी, मुरमाडी आदी ठिकाणी खरिपाची धान खरेदी करण्यात आली. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धान खरेदीला आरंभ होत सुमार धान खरेदी करण्यात आली. शासनाने बोनस जाहीर केल्याने धान खरेदीचा आकडा प्रशंसनीय ठरला.
भंडारा जिल्ह्यात सुमारे ३२ लक्ष १० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली. ८९ धान खरेदी केंद्र अंतर्गत जिल्ह्यातील धान खरेदी केल्या गेली. खरेदीच्या तुलनेत डीओच्या माध्यमाने धानाची भरडाईसाठी उचल होऊ न शकली नाही. त्यामुळे गोदाम व त्याच्या बाहेर धान पडून आहेत. काही ठिकाणचे धान बाहेरचे उचलल्या गेले तर काहींचे गोदामात अर्ध्याच्यावर शिल्लक आहेत. पालांदूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अंतर्गत असलेल्या गोडाऊनमध्ये सुमारे ३३ हजार क्विंटल धान उचल अभावाने शिल्लक आहे. भगीरथ सहकारी भात गिरणी मुरमाडी अंतर्गत ८६०० क्विंटल धान गोदामात पडून आहे. तसेच इतरही धान खरेदी केंद्रात कमी-जास्त प्रमाणामध्ये धान शिल्लक असल्याने उन्हाळी धान खरेदी करण्याचा प्रश्न खरेदी केंद्रापुढे आवासून उभा आहे.
शासन-प्रशासन उन्हाळी धान खरेदी करण्याकरिता खरेदी केंद्रांना वारंवार सूचना देत दबाव वाढवत असताना शिल्लक असलेल्या मालाची उचल करण्याकडे अपेक्षित लक्ष देत नाही. त्यामुळे धान खरेदी केंद्रधारक संकटात सापडलेली आहेत. शेतकरीसुद्धा दररोज धान खरेदी केंद्रधारकांना विचारणा करीत, धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी अशी विचारणा रोजच वाढत चाललेली आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनने अपेक्षित हजेरी लावल्यास शेतकºयांचे हजारो पोती धान मोजणीच्या प्रतीक्षेत असलेली प्रभावित होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. शासन व प्रशासन स्तरावरून शेतकºयांचा विचार करून तत्काळ गोदाामधील खरिपाच्या धानाला उचल देत नव्याने उन्हाळी धान खरेदी करिता सहकार्य करण्याची मागणी केली जात आहे.

उन्हाळी धान खरेदीसाठी शेतकºयांचे रोजच विचारणे वाढलेले आहे. आमच्याकडे सुमारे ३३ हजार क्विंटल धान खरिपाचा अजूनही शिल्लक असल्याने व आमच्याकडे दुसºया गोडाऊनची व्यवस्था नसल्याने धान खरेदी सुरु करणे आम्हाला शक्य वाटत आहे. धानाची उचल वेगाने झाल्यास शक्य तितक्या लवकर उन्हाळी हंगामाचे धान खरेदी करण्यात येतील.
- सुनील कापसे,गटसचिव, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पालांदूर.

Web Title: Kharif paddy falls in the center!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी