शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कहालकर दाम्पत्य पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST

भंडारा : लाखनी तालुक्यातील खराशी येथील रहिवासी असलेले डमदेव कहालकर व मीरा कहालकर यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ...

भंडारा : लाखनी तालुक्यातील खराशी येथील रहिवासी असलेले डमदेव कहालकर व मीरा कहालकर यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यात मीरा कहालकर यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार, तर डमदेव यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मीरा कहालकर या निमगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. सदर पुरस्कार त्यांना नागपूर येथे आयोजित सामाजिक कार्यकर्ता संमेलनात प्रदान करण्यात आला. त्यांच्या विविध शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. याशिवाय शालेय नेतृत्व, नवोपक्रम, सुंदर लेखन, वाचन संस्कृती, लेखन संस्कृती यांची जपणूक, व्यसनमुक्त समाज निर्मिती यासह शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्था खराशीच्या वतीने केलेल्या विविध उपक्रमाची दखलही या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.

डमदेव कहालकर यांना परिवर्तनवादी विचारांनी प्रेरित असलेल्या नागपूर येथील मदत संस्थेतर्फे श्री गुरुदेव सेवा आश्रम नागपूर येथील सभागृहात १८व्या राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कहालकर यांनी शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुद्देशीय संस्था खराशीच्या वतीने गत अनेक वर्षांत विविध सामाजिक, शैक्षणिक, राष्ट्रीय कार्यक्रम राबविले आहेत. याशिवाय व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी त्यांचे अमूल्य असे योगदान आहे. विशेष म्हणजे, त्यांना आतापर्यंत विविध पातळीवर अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुरस्कार प्रदान करताना पांडव चॅरिटेबल ट्रस्ट नागपूरचे गिरीश पांडव, ना.डॉ.नितीन राऊत, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी आमदार दीनानाथ पडोळे आदी उपस्थित होते.