शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

कहालकर दाम्पत्य पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST

भंडारा : लाखनी तालुक्यातील खराशी येथील रहिवासी असलेले डमदेव कहालकर व मीरा कहालकर यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ...

भंडारा : लाखनी तालुक्यातील खराशी येथील रहिवासी असलेले डमदेव कहालकर व मीरा कहालकर यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यात मीरा कहालकर यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार, तर डमदेव यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मीरा कहालकर या निमगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. सदर पुरस्कार त्यांना नागपूर येथे आयोजित सामाजिक कार्यकर्ता संमेलनात प्रदान करण्यात आला. त्यांच्या विविध शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. याशिवाय शालेय नेतृत्व, नवोपक्रम, सुंदर लेखन, वाचन संस्कृती, लेखन संस्कृती यांची जपणूक, व्यसनमुक्त समाज निर्मिती यासह शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्था खराशीच्या वतीने केलेल्या विविध उपक्रमांची दखलही या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.

डमदेव कहालकर यांना परिवर्तनवादी विचारांनी प्रेरित असलेल्या नागपूर येथील मदत संस्थेतर्फे श्री गुरुदेव सेवा आश्रम नागपूर येथील सभागृहात १८व्या राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कहालकर यांनी शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुद्देशीय संस्था खराशीच्या वतीने गत अनेक वर्षांत विविध सामाजिक, शैक्षणिक, राष्ट्रीय कार्यक्रम राबविले आहेत. याशिवाय व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी त्यांचे अमूल्य असे योगदान आहे. विशेष म्हणजे, त्यांना आतापर्यंत विविध पातळीवर अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुरस्कार प्रदान करताना पांडव चॅरिटेबल ट्रस्ट नागपूरचे गिरीश पांडव, ना.डॉ.नितीन राऊत, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी आमदार दीनानाथ पडोळे आदी उपस्थित होते.