शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वीराच्या रक्ताक्षरी अभियानात सहभागी व्हा

By admin | Updated: May 1, 2017 00:27 IST

१ मे १९६० ला विदर्भ महाराष्ट्रात विलीन झाला आणि त्याच दिवसापासून सुजलाम सुफलाम विदर्भाच्या लयाचा सुरुवात झाली.

सरिता निंबार्ते यांचे आवाहन : १ मे रोजी पाळणार काळा दिवस, एक महिन्यांचा कालावधीभंडारा : १ मे १९६० ला विदर्भ महाराष्ट्रात विलीन झाला आणि त्याच दिवसापासून सुजलाम सुफलाम विदर्भाच्या लयाचा सुरुवात झाली. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी वाढून विदर्भाचा बॅकलाँग दिवसेंदिवस वाढतच गेला. राजकीय पक्षांनी वेगळया विदर्भाच्या मुद्द्यावर येथील जनतेची नेहमीच फसवणूक करुन सत्ता काबीज केली. विदर्भाच्या मागणीसाठी आमगाव ते खामगाव पदयात्रा काढणारी भाजपाई सुध्दा काँग्रेस प्रमाणे केवळ आश्वासन देवून विदर्भ मागणीला सत्तेत येताच विसरुन गेले. आता वेगळया विदर्भाची मागणी विदर्भातील जनतेची असून ती सरकार पुढे विविध पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न होत आहे. १ मे पासूनच विदर्भाची उतराती कळा लागली आणि म्हणून हा दिवस विदर्भ राज्य आघाडी काळा दिवस म्हणून दरवर्षी पाळत आली. या वर्षी सुध्दा या काळया दिवसाला व्यापक स्वरुप प्राप्त व्हावे म्हणून भंडारा जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात व मोठया खेडयात विदर्भाचा ध्वज फडकवून काळा दिवस पाळण्यात येईल. तसेच १ मे पासून वीराचा रक्ताक्षरी अभियान सुरु होत आहे या अभियानात अधिकाधिक विदर्भप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन पूर्व विदर्भ महिला आघाडीच्या संयोजिका सरिता निंबार्ते यांनी केले आहे. भंडारा शहरात स्थानिक त्रिमुर्ती चौकात सकाळी ९ वाजता विदर्भाचा ध्वज फडकविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष एॅड. पद्याकर टेम्भूर्णीकर यांनी सांगितले.१ मे काळया दिवसापासून ते महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ मे पर्यंत वीरा रक्ताक्षरी अभियान राबवत असून वेगळया विदर्भाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावकऱ्यांनी दिलेल्या नोंदवहित रक्ताचा स्वाक्षरी करून आपला वेगळया विदर्भाची मागणी करावी आणि महिलांचा त्यात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन सरिता निंबार्ते यांनी यावेळी केले.भंडारा येथे पार पडलेल्या बैठकीला प्रदेश सचिव राकेश भास्कर, पूर्व विदर्भ महिला आघाडीच्या संयोजिका सरिता निंबार्ते, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पद्याकर टेम्भुर्णीकर, रमाकांत पशीने, शब्बीर पठाण, दीपक जांभुळकर, अनिवाश पनके, केशव हूड, सचिन बांडेबूचे, मनोज इरले, अजय मेश्राम, प्रा. वडेटावार, संतोष लांजेवार, सोमनाथ खांडे, अमित टिचकुले, वृंदा गायधने, निहार बुलबुले, विलास शेंडे, माधव फसाटे, देवदास गभने, मंगेश उके, नितीन अंबादे, विजय मेश्राम, बबलू मुनीश्वर व इतर विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)