शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेल्या ‘जय’ चा जयचंद आला

By admin | Updated: March 1, 2017 00:30 IST

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील जय नामक वाघ वर्षभरापूर्वी अचानकरित्या बेपत्ता झाला.

वन्यप्रेमींमध्ये आनंद : ‘जय’च्या बेपत्ता होण्याचे दु:ख कायमविशाल रणदिवे अड्याळउमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील जय नामक वाघ वर्षभरापूर्वी अचानकरित्या बेपत्ता झाला. त्या वाघाचा मृत्यू झाल्याचे खासदार नाना पटोले यांनी सांगितल्यानंतर वनविभाग खडबडून जागा झाला होता. अड्याळजवळील पुरकाबोडी जंगलात ‘जय’सारखा दिसणारा वाघ दिसल्याचे बोलले गेले होते. त्यानंतर प्र्राणीमित्र व वनविभागाच्या चमुने जंगल पिंजून काढले. ठिकठिकाणी कॅमेरे लावले. पंरतु ‘जय’ कुठेही आढळून आला नाही.त्यानंतर वनविभागाची महिनाभर शोधमोहीम सुरू राहिली. कुणालाही कोणताही वाघ दिसला तर तो ‘जय’ असावा. असे सांगत ‘जय’चा शोध व्हायचा. परंतु ना ‘जय’ दिसला ना त्याच्या पाऊलखुणा! जय जिवंत आहे की मृत पावला की त्याची शिकार झाली याबाबत आजही गूढ कायम आहे. आता ‘जय’सारखाच हुबेहुब दिसणारा त्याचा अपत्य ‘जयचंद’ हा वाघ पर्यटकांना भुरळ घालत आहे. त्याचा अधिवास पवनी वनक्षेत्रात अधिक असल्यामुळे पवनी गेटकडे पर्यटक तथा वन्यप्रेमीची गर्दी होऊ लागली आहे. काही वर्षापुर्वी उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात स्थलांतरीत झालेल्या ‘जय’ हा वाघ अल्पावधीत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘जय’ची ओळख ‘सेलीब्रेटी’सारखी झाल्यामुळे त्याला पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक येत होते.सर्वांनाच वेड लावणारा प्राणीमित्रांना आकर्षित करणारा, रूबाबदार शरीरयष्टीचा, उंचपुरा दिसणारा ‘जय’ नामक वाघ १६ एप्रिल २०१६ पासून अचानक बेपत्ता झाला आहे. त्याची शोधमोहीम अजुनही सुरुच असल्याचे वनविभाग सांगत असला तरी तो अद्याप कुणालाही दिसला नाही. ‘जय’ नामक वाघाचा जन्म साकोली तालुक्यातील नागझिरा अभयारण्यात झाला होता. ‘जय’चा भाऊ ‘विरू’ हा पेंच प्रकल्पात स्थलांतरीत झाला आहे. मध्यंतरी ‘जय’ तेलंगना राज्यातील कागजनगर, आदिलाबाद जंगलात गेल्याची चर्चा होती.आता जय व चांदी (टी २) या वाघाचा अपत्य असलेल्या ‘जयंचद’ हा वाघ ‘जय’ची जागा घेण्यासाठी सज्ज झाला आहे. मागील सहा महिन्यापासुन पवनी गेट परिसरात तो दृष्टीस पडत आहे. उमरेड वनक्षेत्रातून तो जुलै २०१६ मध्ये पवनी वनक्षेत्रात दाखल झाला. अडीच वर्षे वयाचा असलेला ‘जयचंद’ हा ‘जय’पेक्षाही रूबाबदार होईल, असे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे. २६ जानेवारी रोजी पवनी वनक्षेत्रात ‘जयचंद’ सह तीन वाघांनी पर्यटकांना दर्शन दिले होते. ‘जयचंद’च्या दर्शनामुळे प्राणीमित्रांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळत आहे.जयचंद नामक वाघ काही दिवसापूर्वी भुयार वनक्षेत्रात आढळून आला. हा वाघ ‘जय’सारखा म्हणण्यापेक्षा त्यापेक्षा धिप्पाड होऊ शकतो. जयचंदमुळे पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे महसुलामध्ये वाढ होऊ शकते.- डी. एन. बारई, वनपरिक्षेत्राधिकारी अड्याळ.