शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रावर आयटीआयमध्ये प्रवेश

By admin | Updated: September 1, 2015 00:27 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा व्यवसाय प्रशासनाकडे कल आहे.

प्रकरण लाखांदूर येथील : चौकशीकरिता उच्चस्तरीय समिती गठितलाखांदूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा व्यवसाय प्रशासनाकडे कल आहे. त्यामुळे तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी शक्कल लढवून कागदपत्रात खोडतोड करून आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेवर मात देत प्रवेश मिळविला आहे. याप्रकरणाचा नागपूर येथील उच्चस्तरीय चमूने तपास हाती घेतला आहे.लाखांदूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरली. येथून प्रशिक्षण घेतल्यानंतर नोकरीची आशा न बाळगता स्वयंरोजगारातून आर्थिक विकास साधून बेरोजगारीचा शाप पुसण्यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे ठरते. सदर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आठ ट्रेड द्वारा प्रशिक्षण दिल्या जाते. प्रवेश प्रक्रिया यापूर्वी सदर प्रशिक्षण केंद्रातून पार पडत असताना शासनाने मागील काही वर्षापासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु केली. प्रशिक्षणार्थ्यांना रिक्त जागा कमी अर्ज जास्त आल्याने कर्मचाऱ्यांनी शक्कल लढविली. आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला मात दिल्याचा प्रकार उघड झाला. विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश अर्ज दिल्यानंतर मुळ कागदपत्रांची छानी करण्याकरिता सदर संस्थेत तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. यामध्ये प्राध्यापक पी.बी. भांगे, प्रा. पी.वाय. साकोरो, प्रा.बी.पी. चांदेवार या तिघांची आॅनलाईन अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांचे मूळ कागदपत्र तपासणी करण्याचे काम दिले होते. एक वर्षानंतर यातील ज्या विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. जवळपास १५ प्रशिक्षणार्थ्यांचे मुळ कागदपत्र व आॅनलाईन अर्ज सादर केलेले कागदपत्र यात मोठी तफावत असून त्यात खोडतोड असल्याचे उघडकीस आले. माहितीनुसार, जास्त टक्केवारी असलेल्या मुलांना प्रवेश मिळाला नसल्याने व कमी टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश कसा काय मिळाला म्हणून उपसंचालक तंत्र व व्यवसाय मार्गदर्शन विभाग नागपूर येथे तक्रार केली. प्रथमदर्शनी तपास केला असता प्रवेश प्रक्रियेतील घबाड उघडकीस आले. यासाठी उपसंचालक विभाग नागपूर येथे चौकशी समिती गठीत करून संपूर्ण २०१४ मधील प्रवेश प्रक्रियेची तपासणी दोन दिवसात करण्यात येणार आहे. सन २०१४-१५ सत्रात बोगस कागदपत्रांच्या आधारावर ज्या १२ ते १५ विद्यार्थ्यांनी येथील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने प्रवेश घेतला त्यातील काही विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाले तर द्विवर्षीय प्रशिक्षण धारक प्रशिक्षण घेत आहेत. प्रवेश प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांची छाननी करणाऱ्यांनी मुळ कागदपत्र का तपासली नाही. यात आर्थिक व्यवहार झाल्याचे आज बोलले जाते आहे. (तालुका प्रतिनिधी)बनावट कागदपत्रांच्या आधारात आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला मात देऊन काही विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांसोबत संगनमत करून प्रवेश मिळविला. यासंदर्भात तक्रार करण्यात आली. उच्चस्तरीय समितीकडून चौकशी होणार आहे. त्यापूर्वी प्राथमिक तपासणी केली असता हे प्रकरण खरे असल्याचे निदर्शनास आले. चौकशीत दोषीवर कारवाई करण्यात येईल.- अनिल कदम, प्रभारी प्राचार्य लाखांदूर.