शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता देतोय अपघाताला आमंत्रण

By admin | Updated: June 29, 2016 00:38 IST

वर्तमानस्थितीत

भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक ५ : जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्याधिकाऱ्यांना निवेदनभंडारा : अत्यंत रहदारीचा रस्ता असूनही मागील दोन दशकांपासून रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नाही. वर्तमानस्थितीत रस्त्याहून जाणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. असे असतानाही नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रभाग क्रमांक ५ मधील हनुमान नगर ते दिवाण सभागृहापर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यासह नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील हनुमान नगर ते दिवाण सभागृहापर्यंतचा रस्ता ठिकठिकाणाहून उखडलेला आहे. मागील २० वर्षांपासून या रस्त्याची अवस्था जैसे थे अशीच आहे. या रस्त्याहून हनुमान नगर, आनंद नगर, समृद्धीनगर, अष्टविनायक नगर, आॅफीसर कॉलनी, म्हाडा कॉलनी, अंबिका नगर तसेच खात रोड परिसरातील नागरिक रहदारी करीत असतात. शहरातील मुख्य मार्गाला जोडणारा रस्ता म्हणूनही याची ओळख आहे. भरगच्च वस्ती असलेल्या प्रभागातील नागरिक या रस्त्याने रहदारी करीत असले तरी नगरपालिका प्रशासन रस्त्याच्या बांधकामाकडे का दुर्लक्ष करीत आहेत हे एक न सुटणारे कोडे आहे. ठिकठिकाणाहून गिट्टी उखडलेली असल्याने दुचाकीस्वार अनेकवेळा स्लीप झालेले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात ही समस्या उग्र रुप धारण करीत असते.मागील दोन दशकांपासून ही समस्या असताना नगरपालिका प्रशासनाने निवेदनाच्या माध्यमातून अनेकदा कळविण्यात आले. प्रभागातील नगरसेवकांचे आपसामध्ये समन्वय नसल्यामुळे या रस्त्याची समस्या ही कायम आहे. या मार्गाहून जवळपास २ हजार नागरिक रहदारी करीत असल्याचे कळते. विशेष करून महिलांना व विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रभागातील चारही नगरसेवकांना या समस्येबाबत कळविण्यात आले. मात्र कुणीही या रस्त्याच्या बांधकामाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. परिसरातील नागरिकांकरिता शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, बसस्थानक, बाजार अशा मूलभूत स्थळी जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. परंतु रस्त्याची दूरवस्था झाल्याने जीव धोक्यात घालून रहदारी करावी लागत आहे. सदर रस्त्याचे त्वरीत बांधकाम करून परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे अशी आर्त हाक येथील नागरिकांनी केली आहे. नगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास ही समस्या मार्गी लागू शकते. फक्त प्रयत्नांची गरज आहे. (प्रतिनिधी)