शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

इन्टरसेफ्टर वाहनाने केली ७२३१ वाहनांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST

भंडारा : जिल्हा वाहतूक शाखेच्या ताफ्यात इंटरसेफ्टर वाहन दाखल झाल्यानंतर वर्षभरात नियम मोडणाऱ्या तब्बल ७ हजार २३१ वाहनांवर त्याद्वारे ...

भंडारा : जिल्हा वाहतूक शाखेच्या ताफ्यात इंटरसेफ्टर वाहन दाखल झाल्यानंतर वर्षभरात नियम मोडणाऱ्या तब्बल ७ हजार २३१ वाहनांवर त्याद्वारे कारवाई करण्यात आली. काळ्या रंगाची काच, मद्यप्राशन, अनियंत्रित वेग आणि विनाहेल्मेट या प्रकरणांचा कारवाईमध्ये समावेश आहे. या वाहनधारकांना ४७ लाख ११ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

भंडारा जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्गासह राज्य आणि जिल्हा मार्ग जातात. या रस्त्यांवर अहोरात्र वाहने धावत असतात. अनेकदा नियमांचे उल्लंघन करून ही वाहने धावतात. यातून अपघातासारखे प्रकार घडतात. नियमानुसार वाहन रस्त्यावरून धावावे, अपघातविरहित प्रवास व्हावा यासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु अहोरात्र धावणाऱ्या वाहनांपुढे वाहतूक पोलीस कमी पडतात. त्यामुळेच जिल्हा पोलीस दलात इन्टरसेफ्टर हे अत्याधुनिक वाहन दाखल झाले आहे. या वाहनाच्या माध्यमातून आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे सहज शक्य झाले आहे.

भंडारा वाहतूक शाखेत इन्टरसेफ्टर वाहन दाखल झाले असून, ते महामार्गावर उभे केले जाते. त्यामध्ये असलेल्या स्पीडगनच्या साह्याने १०० ते १५० मीटर परिघातील वाहनांची नोंद घेऊन नियम मोडला असेल तर तत्काळ ई-चालान फाडले जाते. जानेवारी ते डिसेंबर या काळात इन्टरसेफ्टर वाहनाच्या माध्यमातून ७२३१ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यात डार्क ग्लासेस (काळे काच) वापरणाऱ्या ३०८ वाहनांना ५१ हजार २०० रुपये दंड ठोठावण्यात आला. अनियंत्रित वेगाने वाहन चालविणाऱ्या २४११ वाहनचालकांना २४ लाख ११ हजार रुपये आणि हेल्मेट न वापरणाऱ्या ४४९८ दुचाकीचालकांना २२ लाख ४९ हजार रुपये दंड ठोठावला आहे.

काळे काच असलेल्या वाहनांना ५१ हजार दंड

वाहनांना काळे काच लावणे नियमबाह्य असले तरी अनेकजण आपल्या वाहनांच्या आतील भाग बाहेरील व्यक्तीला दिसू नये म्हणून काळे काच लावतात. भंडारा जिल्हा वाहतूक शाखेने अशा ३०८ वाहनांवर इन्टरसेफ्टर वाहनाच्या मदतीने कारवाई केली. त्यांच्यावर ५१ हजार २०० रुपये दंड ठोठावण्यात आला. जानेवारी महिन्यात ६७, फेब्रुवारी २९, मार्च २७, एप्रिल १६, जून ४, जुलै १८, ऑगस्ट १५, सप्टेंबर ३, ऑक्टोबर ४७, नोव्हेंबर ४५ आणि डिसेंबर महिन्यात ३४ वाहनांवर कारवाई केली.

वाहनधारकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. वाहतूक शाखा त्यासाठी पुढाकार घेत आहे.

-वसंत जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा