शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनाला दिले विमा सुरक्षेचे कवच

By admin | Updated: September 1, 2015 00:33 IST

रक्षाबंधनाचे महत्व सर्वांना माहित आहे. आयुष्यात मदतीकरिता चार माणसे सहज मिळतील.

वरठी : रक्षाबंधनाचे महत्व सर्वांना माहित आहे. आयुष्यात मदतीकरिता चार माणसे सहज मिळतील. पण पैसे उभारण्याकरिता सामान्य माणसाला मोठी कसरत करावी लागते. आर्थिक सुरक्षा ही शारीरिक सुरक्षेपेक्षा गरजेची आहे. म्हणून वेळप्रसंगी सर्वांना आर्थिक सहाय्यता उपलब्ध व्हावी याकरिता वरठी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधुन गावातील २३५ कुटूंबीयाचे सुरक्षा विमा योजनेचे फार्म भरुन घेतले. यासाठी येणारी प्रथम किस्त त्यांनी स्वत:च्या पैशाने भरले. पुढील दोन दिवसात गावातील एक हजार कुटूंबीयांना या योजनेत आणण्यासाठी त्यांचा प्रवास आजही सुरु आहे.काल रक्षाबंधनात होते. सर्वांना ह्या दिवसाची उत्सुकता होती. वर्षातून एकदा येणाऱ्या बहिणीचे आकर्षण व भेट खास होती. रक्षाबंधन हे सुरक्षेचे वचन म्हणून आपण साजरे करतो. सर्वांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताकरिता आतून असल्यामुळे सहजासहजी आपण बाहेर पडत नाही. पण वरठी येथील सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र देशमुख, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे, मिलिंद धारगावे व पूनम बालपांडे हे सकाळपासून गावात घरोघरी फिरले. सर्व सामान्यांच्या घरी शासनाच्या योजना व लाभ सुर्याच्या प्रकाशाप्रमाणे उशिरा पोहचतात. राबराबणारे कष्टकरी माणूस व त्यांच्या कुटूंबीयाचे दीवस व रात्र, सण व उत्सव एकसारखे जातात. याची जाणीव असल्यामुळे यांनी घरोघरी जावून सामान्य लोकांना आर्थिक सुरक्षा कवच देण्याचे ठरवले. कठीण प्रसंगी हातात पैसा नसल्यास सुरक्षेचे सर्व साधणे काळून पडतात. यासाठी आर्थिक सुरक्षा महत्वाची आहे. त्याच उद्देश समोर ठेवून वरठी येथील शास्त्री सुभाष व डॉ. आंबेडकर वॉर्डातील घरोघरी जावून यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व जीवन ज्योती योजनेची माहिती दिली. यातून मिळणारे लाभ समजावून सांगण्यात आले. माहिती देताना केंद्र शासनाची योजना ही राजकीय पक्षवाद यातून सर्व सामान्याच्या फायदयाची कशी याची माहिती देण्यात आली. आर्थिक सुरक्षेचा प्रश्न मिटला की मनस्ताप आणि मानसाच्या चिंता आपोआप कमी होतात. धकाधकीच्या जीवनात कुटूंब प्रामुख्याने बरेवाईट झाल्यास कुटूंब उघड्यावर पडते. यामुळे सर्वांनी स्वत:ची आर्थिक सुरक्षा करुन घ्यावे असे आवाहन करुन इच्छुक कुटूंबाकडून त्यांनी विमा योजनेचे फार्म भरुन घेतले. याकरिता येणारी प्रथम किस्त सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र देशमुख, पुनम बालपांडे, मिलिंद धारगावे व पुष्पा भुरे स्वत: बँकेत जमा करणार आहेत. घरोघरी जावून माहिती देवून ५०० च्या जवळपास कुटूंबीयांचे अर्ज भरुन घेतले. आजही त्यांचा प्रवास सुरुच होता. एक हजार कुटुंबीयांचे फार्म भरुन देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)