शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पटेल महाविद्यालयात वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2016 00:30 IST

जे.एम. पटेल महाविद्यालय मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषांच्या वाङ्मय मंडळाचे संयुक्त उद्घाटन भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते पार पडले.

जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती : भाषांचा दर्जा व विकासाबाबत झाली चर्चाभंडारा : जे.एम. पटेल महाविद्यालय मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषांच्या वाङ्मय मंडळाचे संयुक्त उद्घाटन भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे होते.याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी डॉ.चौधरी यांनी महाविद्यालयातील आधुनिक सुविधा व उत्तम शैक्षणिक वातावरणाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. वाङ्मय मंडळासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना विकसीत करण्यासाठी आणि त्यांच्यातून विविध कलाकार घडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ असून विद्यार्थ्यांनी त्याचा पुरेपुर फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यासारख्या उपक्रमातून भावी आयुष्यात व करियरमध्ये उपयोगी पडणारी आयोजन, नियोजन, सादरीकरण यासारखी अनेक कौशल्ये देखील विकसीत होतात. याकडे त्यंनी लक्ष वेधले. भंडारा नगरीच्या सांस्कृतिक वातावरणातील मरगळ दूर करण्यासाठी जे.एम. पटेल महाविद्यालयाने पुढाकार घेऊन विविध भाषिक साहित्य परिषदा व संमेलनाच्या आयोजनाचा विचार करावा अशीही सूचना त्यांनी याप्रसंगी केली.आपल्या स्वागतपर भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे यांनी विद्यार्थ्यांनी वेळेचे व्यवस्थापन शिकण्याची गरज अधोरेखित केली. नियमित अभ्यासाला जोडून निरनिराळ्या बौद्धीक आणि सांस्कृतिक उपक्रमात भाग घेण्यासाठी वेळेचे व्यवस्थित नियोजन केल्यास आपलाू सर्वांगिण विकास उत्तम प्रकारे होऊ शकतो असे त्यांनी सांगितले. भारतातील भाषिक विविधतेमुळे आपण अनेक भाषांतील साहित्य अभ्यासू शकतो. परंतु त्यासोबतच इंग्रजी भाषेवर प्रभूत्व मिळवणेही आवश्यक आहे असे आवाहन त्यांनी केले.संचालन मराठी विभाग प्रमुख प्रा.सुमंत देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उर्दू विभागाच्या प्रा.शाहिना अंजुम यांनी केले. याप्रसंगी साहित्य मंडळाचे समन्वयक व इंग्रजी विभागप्रमुख डॉ.अमोल पदवाड व हिंदी विभागप्रमुख डॉ.विनी ढोमणे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ.कार्तिक पणीकर, प्रा.ममता राऊत, डॉ.उमेश बन्सोड, प्रा.अनिता जायस्वाल व साहित्याच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)