शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

राशन तर मिळाले भाऊ, याले आता कायच्यासोबत खाऊ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST

केंद्र व राज्य शासनाने राशन कार्डधारकांना लॉकडाऊनच्या काळात तांदूळ, गहू वितरण सुरु केले आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची एकप्रकारे सोय झाली. परंतु आता या धान्यासोबत त्यांच्यापुढे नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. गत तीन आठवड्यापासून सर्व व्यवहार ठप्प आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांकडे एकही छदामही राहिला नाही.

चरणदास बावणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा-कोसरा : ‘राशन तर मिळाले भाऊ, याले आता कायच्यासोबत खाऊ’ असा सवाल स्वस्त धान्य दुकानातून धान्य घरी घेऊन जाणारा पवनी तालुक्यातील कोंढा-कोसरा येथील एक कार्डधारक करीत होता. लॉकडाऊनने सर्व कामे ठप्प झाली आहेत. हातात पैसा नाही, शासनाने धान्य दिले परंतु मीठ, मिरची, तेल आणायचे कसे असा प्रश्न ग्रामीण भागातील गोरगरिबांपुढे पडला आहे.
केंद्र व राज्य शासनाने राशन कार्डधारकांना लॉकडाऊनच्या काळात तांदूळ, गहू वितरण सुरु केले आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची एकप्रकारे सोय झाली. परंतु आता या धान्यासोबत त्यांच्यापुढे नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. गत तीन आठवड्यापासून सर्व व्यवहार ठप्प आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांकडे एकही छदामही राहिला नाही. त्यामुळे तांदूळ गहू मिळाले पंरतु ते कशासोबत खायचे असा प्रश्न आहे. कोरोनाच्या संकटाने सर्वसामान्यांचे जीवन संकटात आले आहे. अनेकांसमोर कठीण समस्या निर्माण झाली आहे. दोनवेळ चुल पेटणेही कठीण झाले आहे. शासनाने धान्यासोबत तिखट, हळद, मीठ, दिले असते तर चांगले झाले असते, असे मजूर म्हणत आहे.
सध्या सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन आहे. आधी हा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार असे सांगण्यात आले होते. पंरतु लॉकडाऊन आता ३० एप्रिलपर्यंत वाढला आहे. त्यामुळे असंघटीत कामगार, मजूर, भटक्या समाजाचे हाल होत आहे. अनेक मजूर महानगरातून गावात पोहोचले आहे. त्यांना गावात कोणते काम करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातीलच मजुरांना काम नाही, तर बाहेरुन आलेल्यांना काम कसे मिळणार. पैसाच नाही तर चिलापिल्यांना जगवायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकंदरीतच या लॉकडाऊनने गोरगरीबांपुढे दोन वेळच्या भोजनाचा प्रश्न निर्माण केला आहे. शासन धान्य देत असले तरी त्यासोबत लागणाºया इतर साहित्यांचे काय? असा यक्ष प्रश्न सर्वांपुढे आहे.
 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या