शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रोफायनान्स कार्यालयाला घातला शेकडो महिलांनी घेराव

By admin | Updated: March 1, 2017 00:28 IST

येथील मायक्रोफायनान्स कंपनीच्या कार्यालयावर तुमसर तालुक्यातील शेकडो महिलांनी मंगळवारला धडक मोर्चा काढून व्यवस्थापकांना घेराव घातला.

तुमसरातील प्रकार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला पुढाकारतुमसर : येथील मायक्रोफायनान्स कंपनीच्या कार्यालयावर तुमसर तालुक्यातील शेकडो महिलांनी मंगळवारला धडक मोर्चा काढून व्यवस्थापकांना घेराव घातला. कर्ज घेतलेल्या महिलांकडे नगदी रक्कम भरण्याची स्थिती नाही. शासनाने कर्जमाफी देऊन मायक्रोफायनान्सच्या तावडीतून सुटका करण्याची मागणी पीडित महिलांनी केली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात मायक्रोफायनान्स कंपनीच्या कार्यालयावर शेकडो महिलांनी धडक देऊन व्यवस्थापकांना घेराव घातला. शहरातील प्रमुख मार्गाने ग्रामीण परिसरातील शेकडो महिला तुमसरात दाखल झाल्या होत्या. महिला बचत गटाद्वारे पतपुरवठा करून साप्ताहिक, पंधरवाडा, मासिक वसुलीसह व्याज आकारून महिलांना धमकाविण्याचा प्रकार मायक्रोफायनान्सकडून सुरु आहे. कर्ज घेणाऱ्या सदस्यांच्या घरी रात्री पैशाचा तगादा लावण्यात येत आहे. यामुळे महिलांत सध्या भीतीचे वातावरण आहे. व्यवसायीकांच्या पाशातून स्त्री शक्तीची मुक्तता करण्यास शासनाने हस्तक्षेप करून अवैध कर्ज माफ करण्याची मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.मार्च महिन्यात राज्याचे कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर येणार आहेत. तेव्हा भंडारा जिल्ह्यातील हजारो महिलांचा मेळाव्यात कर्जबाजारी महिला आपल्या व्यथा मांडणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राकेश चोपकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मायक्रोफायनान्स कंपनीने ग्रामीण भागात नेटवर्क तयार करून कर्ज वाटप केले. याची माहिती प्रशासनाला नव्हती काय? होती तर त्यांनी याची दखल का घेतली नाही. असा प्रश्न उपस्थित करून ३५ टक्के व्याजाने रक्कम कशी कर्ज म्हणून देण्यात येईल. यासंदर्भात पुढील कारवाई करण्यात येईल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश चोपकर, सचिव सेलोकर यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)