शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कसे आहात, ठीक आहे, दोन शब्द आप्तांचे देतात कोरोना संकटात दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 05:00 IST

कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरत नाही तोच दुसरी लाट आली. एवढी भयानक की, मृत्यूचे तांडव सुरू झाले. स्मशानातही जागा मिळणे कठीण झाले. मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. कोरोनाने अनेकांचे जिवलग हिरावले. कुणाचे सर्वस्व गेले. दररोज अप्रिय घटना कानावर पडत आहेत. आज त्याचा मृत्यू झाला, काल अगदी जवळचा मित्र गेला. कुणाचा पती तर कुणाचा वडील कोरोनाच्या करालदाढेत गेला.

ठळक मुद्देख्यालीखुशाली : महामारीच्या तांडवात समाजमन भयभीत, संकटाच्या काळात आप्त स्वकीयांमध्ये वाढला संवाद

ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आज हा गेला, काल शेजारच्याचा मृत्यू झाला, तो आयसीयुमध्ये भरती आहे. अशा वार्ता चोहोबाजूंनी कानावर पडत आहेत. कसे आहात, ठीक आहे, हे आप्तस्वकीयांचे दोन शब्द कोरोना संकटात दिलासा देतात. कोरोना महामारीच्या तांडवाने समाजमन भयभीत झाले आहे. प्रत्येक जण एकमेकांची ख्यालीखुशाली विचारत आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरत नाही तोच दुसरी लाट आली. एवढी भयानक की, मृत्यूचे तांडव सुरू झाले. स्मशानातही जागा मिळणे कठीण झाले. मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. कोरोनाने अनेकांचे जिवलग हिरावले. कुणाचे सर्वस्व गेले. दररोज अप्रिय घटना कानावर पडत आहेत. आज त्याचा मृत्यू झाला, काल अगदी जवळचा मित्र गेला. कुणाचा पती तर कुणाचा वडील कोरोनाच्या करालदाढेत गेला. कोरोना एवढा निष्ठुर की अगदी रक्ताच्या नात्यातील व्यक्तीच्याही अंत्यसंस्काराला जाणे दुरापास्त.  अशा या भयभीत वातावरणात स्वत:ची काळजी घेत आप्तस्वकीयांची ख्यालीखुशाली विचारली जात आहे. दररोज कुणाचा ना कुणाचा फोन येतो. कसे आहात एवढे दोन शब्द सुरुवातीलाच विचारले जाते. ठीक आहे, असे शब्द कानावर पडले की, दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटतात. कुणी सर्दी, पडसे, ताप आहे असे सांगितले की, काळजीच्या स्वरात लवकर टेस्ट करून घे, दवाखान्यात जा, असा सल्ला देतात.  कुणी नातेवाईक रुग्णालयात दाखल असेल तर त्याची ख्यालीखुशाली विचारली जाते. अनाहूतपणे कुणाचा फोन आला तर दोन क्षण मनात चर्र होते. समोरचा काय सांगेल याची चिंता त्याचे दोन शब्द कानी पडेपर्यंत लागलेली असते. अशा वातावरणात आज प्रत्येक जण चिंतेत दिसत असून आप्तस्वकीयांच्या ख्यालीखुशालीने चेहऱ्यावर समाधानाचे भाव आणत कोरोना कधी संपेल, याची प्रतीक्षा करीत आहे.भंडारा जिल्ह्यात महिनाभर कोरोनाचे तांडव सुरू होते. अनेकांचा कोरोनाने बळी घेतला. आजही अनेक जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. दुसरीकडे रुग्णालयात बेडसाठी धावपळ करावी लागत आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी अनेकांनी पायपीट केली आहे. अशा परिस्थितीतून जात असताना गत चार दिवसांपासून थोडा दिलासा मिळत आहे. रुग्ण संख्या घटत आहे. घटती रुग्ण संख्या पाहून समाधानाची लकेर चेहऱ्यावर उमटत आहे. या कोरोनाने एकमात्र केले आप्त स्वकीयांना संकटाच्या काळात एकत्र आणून संवाद वाढविला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या