शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

घराघरांत ग्रामगीतेचे वाचन गरजेचे

By admin | Updated: November 29, 2014 23:15 IST

जीवन सुखमय व आनंदी करण्यासाठी कर्तव्यतत्परता आवश्यक आहे. शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांची विचारसरणीच जगाला तारू शकते.

पालांदुरात कार्यक्रम : सत्यपाल महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी पालांदूर (चौ.) : जीवन सुखमय व आनंदी करण्यासाठी कर्तव्यतत्परता आवश्यक आहे. शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांची विचारसरणीच जगाला तारू शकते. आपल्या आचरणात, विचारात अपेक्षित बदल घडण्याकरिता प्रत्येक घरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचे वाचन महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सत्यपाल महाराज यांनी केले.पालांदूर येथे शहीद श्रद्धांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर खा. नाना पटोले, तारीक कुरैशी, जिल्हा परिषद सदस्य सविता ब्राम्हणकर, भरत खंडाईत, वैशाली खंडाईत, उत्तम नंदनवार, उद्योगपती चांदे उपस्थित होते. सत्यपाल महाराज म्हणाले, प्रत्येक घरात शौचालयाचा वापर करण्याची गरज आहे. गावात रोजगार शोधल्यास बेरोजगारी कमी होईल. आई वडिलांची सेवा हिच ईश्वरसेवा आहे. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, तुझ गावच नाही तिर्थ ही तुकडोजींची वाणी गात खान्देशाची ढोलकीचा ताल सप्तखंजेरीतून धरला. अत्यंत मनमोहक शैलीत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून चित्रपटांच्या गाण्यांच्या सोबतीने तीन तास प्रबोधन केले. सत्यपाल महाराजांना पेटीवादक गजानन चिंचोळकर, तबलावादक राहुल सोनवाने, सुनिलकुमार व सुखदेव चिंचोळकर यांनी साथ दिली. कार्यक्रम माला उपस्थितांचे आभार जि.प. सदस्य भरत खंडाईत यांनी मानले. (वार्ताहर)