जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकूल वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:24 IST2021-06-17T04:24:38+5:302021-06-17T04:24:38+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसंगे व ...

Home school distribution to the beneficiaries at the hands of the Collector | जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकूल वितरण

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकूल वितरण

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसंगे व अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामपंचायत खापा येथील हरिदास वानोसा सिडाम, नितेश बळीराम वरकडे, रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामपंचायत डोडमाझरी येथील चरण रावजी वंजारी व शबरी आवास योजनेंतर्गत ग्रामपंचायत खापा येथील उमराव श्रीपत कोळवते यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते घरकुलाची चावी वितरित करण्यात आली.

तसेच पंचायत समिती स्तरावर भंडारा येथे आमदार नरेंद्र भोंडेकर व खंड विकास अधिकारी नूतन सावंत यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व चावी देऊन ई गृह प्रवेश करण्यात आला. ई-गृह प्रवेशाचे लाभार्थ्यांमध्ये सुमन धनराज चामलाटे रा. आंबाडी, शोभा गोपाल वरकडे रा. खापा (रावनवाडी), गोपाल मिताराम वरकडे रा. खापा (रावनवाडी), धनराज विठोबा मेश्राम रा. खमारी, राजकुमार दामोधर पेशने रा. तिड्डी यांचा समावेश आहे.

Web Title: Home school distribution to the beneficiaries at the hands of the Collector