शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

दिवाळीत गरजवंताना पोलीस विभागाचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 5:00 AM

माऊली सेवा मित्र मंडळ नागपूरचे सुहास खरे यांच्या चमूच्या सहकार्याने पोलीस स्टेशन केशोरी येथील ठाणेदार बी.एस.मुंडे यांनी आदिवासी बांधवांना दिवाळी भेट दिली. भारतीय संस्कृतीत दिवाळी सर्वात मोठा व महत्वाचा सण आहे. गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येक व्यक्ती आपल्या मिळकतीनुसार सण साजरा करतो. आदिवासी नागरीक आपल्या उत्पन्नानुसार आपल्या व आपल्या कुटुंबाच्या मुलभूत गरजा पूर्ण करतात. 

ठळक मुद्दे२०० कुटुंबांना मदत

  लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी मोरगाव : जिल्ह्यातील नक्षलबहुल आदिवासी भागात पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे,अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधीकारी जालींदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील आंभोरा येथे सोमवारी आदिवासी बांधवांना दिवाळी निमित्त विविध भेटवस्तू देऊन दिवाळी भेट कार्यक्रम साजरा करण्यात आला. माऊली सेवा मित्र मंडळ नागपूरचे सुहास खरे यांच्या चमूच्या सहकार्याने पोलीस स्टेशन केशोरी येथील ठाणेदार बी.एस.मुंडे यांनी आदिवासी बांधवांना दिवाळी भेट दिली. भारतीय संस्कृतीत दिवाळी सर्वात मोठा व महत्वाचा सण आहे. गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येक व्यक्ती आपल्या मिळकतीनुसार सण साजरा करतो. आदिवासी नागरीक आपल्या उत्पन्नानुसार आपल्या व आपल्या कुटुंबाच्या मुलभूत गरजा पूर्ण करतात. या समाजाला मुलभुत सुविधांची गरज असताना प्रेमाची आवश्यकता आहे. याबाबीकडे लक्ष देत आदिवासी नागरीक व त्यांच्या मुलांना मदत मिळावी म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला. कोराेनाच्या संसर्गामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील व्यवसाय व उद्योग धंदे बंद झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील केशोरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भाग हा अतिदुर्गम व संवेदनशील असून या भागात राहणारे लोक हे बहुसंख्येने आदिवासी बांधव आहेत. या भागात कोणतेही रोजगाराची साधने उपलब्ध नसल्याने नागरीकांची शहरी भागाकडे ओढ लागते. मात्र यंदा कोरोनामुळे त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत साजरी करण्याचे गोंदिया पोलिसांनी ठरविले आहे.  माऊली सेवा मित्र मंडळ नागपूर या मंडळाचे प्रमुख सुहास खरे व त्यांचे सर्व सहकारी मित्र परिवाराच्या मदतीने गावातील २०० ते २५० लोकांना धोतर, साडया, ब्लँकेट, दिवाळी फराळ व मुलांना शालेय वह्या,पेन पेन्सील आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यादरम्यानरांगोळी स्पर्धा,गायन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करुन बक्षीस वितरण करण्यात आले. यशस्वीतेसाठी गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती आणी मान्यवरांनी सहकार्य केले.

टॅग्स :Policeपोलिस