आशावर्कर व अंगणवाडी सेविकांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:00 AM2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:00:42+5:30

गरजू नागरिकांसह कोरोनाच्या लढाईत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आवश्यक मदत करणाºयांसाठी मदतीचे हात समोर येत आहेत. वरठी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन कोरोनाच्या संदर्भात घरोघरी फिरून आवश्यक माहिती गोळा करणाºया आशावर्कर व अंगणवाडी सेविका यांना पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या.

Help for Aswarkar and Anganwadi Servants | आशावर्कर व अंगणवाडी सेविकांना मदतीचा हात

आशावर्कर व अंगणवाडी सेविकांना मदतीचा हात

googlenewsNext
ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : वरठी येथे पाण्याच्या उच्च दर्जाच्या बाटल्या वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : कोरोनाच्या लढाईत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतीचे ओघ सुरूच आहे. गरजू नागरिकांसह कोरोनाच्या लढाईत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आवश्यक मदत करणाऱ्यांसाठी मदतीचे हात समोर येत आहेत. वरठी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन कोरोनाच्या संदर्भात घरोघरी फिरून आवश्यक माहिती गोळा करणाºया आशावर्कर व अंगणवाडी सेविका यांना पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या.
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा तापत्या उन्हात घरोघरी जाऊन कोरोना संशयीत रुग्ण व नागरिकांची आवश्यक माहिती गोळा करण्याचे काम आशावर्कर व अंगणवाडी सेविका यांच्यावर आहे. माहितीकरिता गावात फिरताना धास्तीने कुणी घरातही प्रवेश देत नाहीत.
उन्हाचा पारा वाढल्याने त्यांना पाण्याची गरज भासते. पण परिस्थितीमुळे त्यांना काम अवघड होत आहे.
उन्हाच्या तडाख्यात काम करणाऱ्यांची नेमकी अडचण लक्षात घेऊन वरठी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आशावर्कर व अंगणवाडी सेविका यांना पिण्याचे पाणी वाहून नेणाऱ्या बाटल्याचे वाटप केले. सदर बाटल्या थर्मास प्रकारच्या असून थंड पाणी थंड व गरम वस्तू गरम ठेवणाऱ्या आहेत. त्यामुळे आशावर्कर व अंगणवाडी सेविका यांना मोलाची मदत मिळाली आहे.
वरठी येथील ११ आशावर्कर व १० अंगणवाडी सेविकांना सदर बाटल्या वाटप करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच मनोज सुखाणी, सामाजिक कार्यकर्ते घनश्याम बोन्द्रे, संदीप बोन्द्रे, गणेश पिंगळे, सचिन माहुले, संगीता सुखाणी, सुजाता भाजीपाला, श्रीरंग बोन्द्रे, महादेव मते उपस्थित होते. वाटप करताना सामाजिक अंतराचे भान ठेवण्यात आले होते.

Web Title: Help for Aswarkar and Anganwadi Servants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.