मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST2021-06-05T05:00:00+5:302021-06-05T05:00:23+5:30

कोरोना संकटाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना निसर्गाने यंदा चांगले संकेत दिले आहे. केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्याचे वृत्त धडकले. जिल्ह्यातही वातावरणात बदल होऊन दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. भंडारा शहरात सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली. तुमसर तालुक्यात सायंकाळी ५ वाजता अर्धा तास जोरदार पाऊस बरसला.

Heavy presence of pre-monsoon rains | मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

ठळक मुद्देजिल्ह्यात सर्वदूर पाऊस : लाखांदूरमध्ये गत २४ तासात २९.४ मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकरी मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असून केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचे वृत्तासोबतच भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. तुमसरपासून लाखांदूरपर्यंत आणि साकाेलीपासून भंडारापर्यंत सर्वत्र पाऊस कोसळला. लाखांदूर येथे तर गत तीन दिवसांपासून पाऊस कोसळत असून शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता जोरदार पाऊस झाला. लाखांदूरमध्ये गत २४ तासात २९.४ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाचा फटका धान मळणीला बसत आहे. 
कोरोना संकटाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना निसर्गाने यंदा चांगले संकेत दिले आहे. केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्याचे वृत्त धडकले. जिल्ह्यातही वातावरणात बदल होऊन दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. भंडारा शहरात सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली. तुमसर तालुक्यात सायंकाळी ५ वाजता अर्धा तास जोरदार पाऊस बरसला. तालुक्यातील काही भागात पावसाची नोंद झाली. 
मोहाडी तालुक्यात सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. साकोलीतही अर्धा तास मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला. लाखनी आणि पवनी तालुक्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली. पालांदूर परिसरात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाने हजेरी लावली. वातावरणात गारवा निर्माण झाला होता. लाखांदूर तालुक्यातील दिघोरी परिसरात अर्धा तास पाऊस बरसला. लाखांदूर तालुक्यात गत दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता या परिसरात जोरदार पाऊस कोसळला. गुरुवारी वादळात वीज कोसळून एक गाय ठार झाल्याची घटना तालुक्यात घडली होती. जिल्ह्यात सध्या धान मळणीचे काम शेवट्या टप्यात आहे. अनेकांचा धान उघड्यावर असून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे.

जिल्ह्यात १५ ते १७ जूनदरम्यान मान्सूनचे आगमन 
- केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाले असून पुढील प्रवास निर्विघ्नपणे झाल्यास भंडारा जिल्ह्यात १५ ते १७ जून दरम्यान मान्सूनच्या पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. सध्याच्या पूर्व मोसमी पावसाच्या सरीवर पेरणी न करता समाधानकारक पाऊस झाल्यास (७५ ते १०० मिमी) जमिनीत ओलावा आल्याची खात्री करूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन केले आहे. हवामान आधारित कृषी सल्ला व अचूक अंदाज प्राप्त होण्यासाठी जिल्हा हवामान केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. एन.एस. वझिरे, साकोली येथील कृषि विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात १ ते ४ जून दरम्यान ६.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. त्यात लाखांदूर तालुक्यात आतापर्यंत ३४.३ मिमी, पवनी १०.२ मिमी आणि लाखनी ३.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

 

Web Title: Heavy presence of pre-monsoon rains