शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

रसायनयुक्त पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: January 11, 2015 22:44 IST

औषध भुकटी तयार करणाऱ्या कारखान्यातील अतिरिक्त रसायनयुक्त पाणी कारखान्याबाहेर नाल्याशेजारी साठवणूक केली जाते. रसायनयुक्त पाण्यात सल्फ्यूरिक आम् लाचा समावेश आहे.

व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : नाल्याशेजारीच रसायनयुक्त पाण्याचा हौद, पाण्याचा निचरा नाल्याततुमसर : औषध भुकटी तयार करणाऱ्या कारखान्यातील अतिरिक्त रसायनयुक्त पाणी कारखान्याबाहेर नाल्याशेजारी साठवणूक केली जाते. रसायनयुक्त पाण्यात सल्फ्यूरिक आम् लाचा समावेश आहे. त्याला निष्प्रभ करण्याकरिता कारंजे लावले आहेत. या पाण्याचा निचरा लागून असलेल्या नाल्यात होतो. या पाण्यामुळे मानवासहीत पशूंचे आरोग्य धोक्यात आले आहे.तुमसर गोंदिया राज्य महामार्गाशेजारी देव्हाडी (तुमसर रोड) शिवारात क्लेरियन ड्रग नावाची औषधी भुकटी तयार करणारी कंपनी मागील २० वर्षापूर्वी सुरु झाली होती. कंपनीच्या आवाराशेजारी या कंपनीने रसायनयुक्त पाणी (सल्फ्युरिक आम्ल) निष्प्रभ करण्याकरिता मोठा हौद तयार केला आहे. हा हौद काळ्या प्लॉस्टीक आवरणाचा आहे. या हौदाला लागूनच नाला वाहतो. या नाल्यात रसायनयुक्त पाण्याचा निचरा सातत्याने होतो. नाल्यात पाणी असल्याने येथे पाळीव जनावरे पाणी पिण्याकरिता नेहमी येतात. परिसरात शेती आहे. अनेक शेतकरी या नाल्यातील पाणी सिंचनाकरीता वापरतात. परिणामी या रसायनयुक्त पाण्याचा पशुसोबतच मानवी आरोग्यला धोका निर्माण झाला आहे.रसायनयुक्त पाण्याचा हौदाला आवारभिंत अथवा सुरक्षा कठडे कारखाना प्रशासनाने लावलेले नाहीत. काटेरी कुंपणाचे लोखंडी खांब येथे तेवढे शिल्लक आहेत. काटेरी कुंपण काही वर्षाने तुटले त्यानंतर कारखाना व्यवस्थापनाने पुन्हा तयार केले नाही. या रसानयुक्त पाण्याच्या संपर्कात आल्यावर अथवा या महामार्गाने प्रवास केला तेव्हा उग्र वास येतो. वायूगळती तर झाली नाही ना असा भास येथे होतो. औषध भुकटी अथवा औषध तयार करणाऱ्या कारखान्याला पर्यावरण, वायू प्रदूषण तथा जलप्रदूषण मंडळाची रितसर परवानगी घ्यावी लागते. या मंडळाचे येथे नेहमी पथक येतात. ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देऊन जातात. परंतु सुरक्षेच्या दृष्टीकोणातून रसायनयुक्त पाण्याच्या हौदाकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. उग्र वास का? व किती येते? हा येथे संशोधनाचा विषय आहे. नाकाला तीव्र झिंग येथे येते हे विशेष. ग्रामपंचायत देव्हाडीचे सुद्धा येथे दुर्लक्ष दिसून येते. कोट्यवधी रूपयांचा नफा कमविणाऱ्या कारखाना प्रशासनाने नागरिकांच्या तथा पशुंच्या आरोग्याचे रक्षण करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)