शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ पाणी वितरणासाठी फिरतो वणवण

By admin | Updated: May 20, 2017 00:57 IST

निवडणुकीत अनेक आश्वासने लोकांना दिली जातात. मात्र ती प्रत्यक्षात उतरणार की नाही हे निवडणूक निकालानंतर अवलंबून असते.

पराभवानंतरही आश्वासनाची पूृर्ती : साकोलीत मोफत पाण्याचा पुरवठा शिवशंकर बावनकुळे । लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : निवडणुकीत अनेक आश्वासने लोकांना दिली जातात. मात्र ती प्रत्यक्षात उतरणार की नाही हे निवडणूक निकालानंतर अवलंबून असते. पराभव झाला तर अशा आश्वासनांचा विसरच पडल्याचे आजपर्यंत आपण अनुभवले आहे. मात्र साकोलीच्या प्रभाग क्रमांक एक मधून पराभूत झालेले झनकलाल लांजेवार यांनी आपले वेगळेपण कायम ठेवले आहे. निवडणुकीत पराभव झाले असले तरी लोकांच्या समस्याप्रती तळमळ असल्याने त्यांनी स्व:खर्चाने टँकर लावून वॉर्ड क्रमांक एक मधील लोकांना पाणी पुरविण्याचे काम सुरू केले आहे. मुळात सामाजिक कार्याची आवड असलेल्यांना राजकारणातील जय, पराजय काम करण्यापासून थांबवू शकत नाही हेच झनकलाल यांच्या निमित्ताने स्पष्ट होते. नगर परिषद, निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून भाजपचे उमेदवार असलेले झनकलाल यांचा पराभव झाला. मात्र पराभवाचे खापर मतदारावर न फोडता त्यांनी सर्वसामान्यांशी आपली नाळ न तोडता उलट निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांच्या पुर्तीच्या दृष्टीने त्यांनी पाऊल टाकले. प्रभाग क्रमांक १ मध्ये असलेली पाणी समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. बोलल्याप्रमाणे त्यांनी स्व:खर्चाने प्रभागात मोफत पाणी पुरवठा करण्याचा सपाटा लावला आहे. एकीकडे प्रशासन लोकांची गरज पूर्ण करण्यात असमर्थ ठरत असताना झनकलाल यांनी मात्र आपले कर्तव्य पार पाडण्यात सुरूवात केली आहे. दिवसभरातून सहा ते सात वेळा वॉर्डात फिरून लोकांना पाणी पुरवितो. पराभवरानंतरही समाजसेवेत खंड न पडू देणारा पराभव असला तरी नक्कीच तो नगरसेवक आहे.