शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
6
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
7
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
8
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
9
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
10
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
11
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
12
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
13
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
14
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
15
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
18
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
19
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
20
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे हातमाग विणकरांना सूत मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

मुखरु बागडे। लोकमत न्यूज नेटवर्क पालांदूर : कोरोना संकटात लॉकडाऊनचा फटका सर्वच उद्योग व्यवसायाना बसत असून विणकरांचे हातही रिकामे ...

ठळक मुद्देफटका : पालांदूर येथील नऊ विणकर कुटुंबांवर उपासमारीची वेळ

मुखरु बागडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : कोरोना संकटात लॉकडाऊनचा फटका सर्वच उद्योग व्यवसायाना बसत असून विणकरांचे हातही रिकामे आहे. सूत मिळत नसल्याने लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील नऊ कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पालांदूर येथे नागपूर येथील महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या अख्त्यारित नऊ विणकर कापड विणण्याचा व्यवसाय करतात. गरीब कुटुंबातील या मंडळीचा चरितार्थ त्यावरच चालतो. त्यामुळे लॉकडाऊनमुळे त्यांच्यासमोर मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पालांदूर येथे तानबा धकाते, ताराचंद धकाते श्रीराम बोकडे, नत्थु नंदनवार भोजराज नंदनवार, रामदास धकाते, माधव नंदनवार, जाधव नंदनवार, छगन नंदनवार आदी विणकर व्यवसाय करतात.
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विणकर बांधव आहेत. यांत्रिकीकरणाच्यापुर्वी हा समाज त्यावरच उदरनिर्वाह करायचे. मात्र यांत्रिकीकरणाचे हातमाग मागे पडला. घरात दारिद्रय पोहोचले. पालांदूरात आजही ५००च्या वर विणकर समाज स्थिरावला आहे. त्यातील काही जण गुजरातच्या सुरतमध्ये कामाच्या शोधात गेले आहे. आता लॉकडाऊनने त्यांच्यापुढेही समस्या निर्माण झाली आहे. या समाजाला लॉकडाऊनच्या काळात शासकीय योजनांचा लाभ मिळाला नसल्याचे सांगितले जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.

पालांदूरच्या कापडाची ख्याती
पालांदूर येथे सिल्क कापड तयार केले जातात. दिवसभर विणकर फटफट आवाज करीत विणन्याचे काम करतात. तिक्ष्ण नजरेने विणकाम केले जाते. हाताने तयार केलेले कापड आकर्षक व टिकाऊ असल्याने त्याला मोठी मागणी आहे. मात्र सूत नागपूर येथील महामंडळाकडून पुरविल्या जात असल्याने ते खाजगीत विकू शकत नाही. सध्याच्या लॉकडाऊनमुळे सूतही मिळणे कठीण झाले आहे. परिणामी विणकर समाज अडचणीत सापडला आहे. आम्हाला तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी तानबा धकाते यांनी यावेळी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या