शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

तलाव स्वच्छतेसाठी सरसावले सामाजिक बांधिलकीचे हाथ

By admin | Updated: October 1, 2015 00:46 IST

श्रद्धा आणि मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पाचे विसर्जन झाले असले तरी ज्याठिकाणी विसर्जन केले...

लोकमत शुभ वर्तमान : वरठीत स्वच्छतेचा ध्यासतथागत मेश्राम वरठीश्रद्धा आणि मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पाचे विसर्जन झाले असले तरी ज्याठिकाणी विसर्जन केले त्याठिकाणी मूर्तीचे अवशेष पाण्यावर तरंगत होते. हा प्रकार लक्षात येताच विरेंद्र देशमुख, पुष्पा भुरे व बंडू निंबार्ते यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत तलावातून ते बाहेर काढून स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला. यापूर्वी विसर्जनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी या तलावाची स्वच्छता केली होती. दहा दिवस अपार श्रद्धा मनात ठेवून बाप्पाच्या सेवेत तरुणाचे जत्थे कार्यरत दिसतात. ज्या भागात आगमन होते तिथे उत्सव आणि मनोभावे पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीपासून विसर्जन सुरु होते. या दरम्यान ही बाप्पांप्रती असलेली श्रद्धा बाळगून असतात. विसर्जन करताना कंठ दाटून येतो. पण ज्याठिकाणी विसर्जन होते, त्याठिकाणी दुसऱ्या दिवशी कुणी ढुंकुनही पाहत नाही. श्रद्धेने पूजलेले दैवत आणि त्यासाठी वापरलेले साहित्य पाण्यात गटांगळ्या खाताना दिसतात. वरठीतही असे भयानक दृश्य होते. गावातील तिघांनी पुढाकार घेऊन तलाव स्वच्छ केले. हजारोंच्या दानातून विसर्जीत झालेल्या बाप्पाला गावात तीनच हात उपयोगाचे सापडले. वरठी येथे सार्वजनिक उत्सवादरम्यान सर्व मूर्तीचे विसर्जन रेल्वेच्या तलावात होते. सदर तलाव गावाच्या मध्यभागी आहे. रेल्वे विभागाच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका गावकऱ्यांना बसत आहे. तलावात घाणच घाण पसरली आहे. या तलावात पाणी मोठ्या प्रमाणात असले तरी तलावातील घाण उपसा न झाल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. नाईलाजास्तव गावकऱ्यांना मूर्तीचे विसर्जन या तलावात करावे लागते. अनंत चतुर्दशीपासून सुरु झालेले विसर्जन काल संपले. पण ज्याठिकाणी हे विसर्जन झाले त्या भागात विसर्जीत मूर्तीचा इतर भाग, हार व पुजेसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्यावर तरंगत होते. मूर्तीचे अवशेष पाण्यावर तरंगतांना पाहून ओबीसी सेवा संघाचे तालुकाध्यक्ष विरेंद्र देशमुख, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे व गावात घरोघरी जावून ब्रेड विकणारे बंडू निंबार्ते यांनी तलावाची स्वच्छ करण्याची मोहीम हातात घेतली. यासाठी त्यांनी अनेकांना येण्याचे आवाहन केले. पण श्रद्धेने व्याकुळ, बाप्पांना निरोप देणारे आणि डी.जे.च्या तालात नाचणारे एकही यात सहभागी झाले नाही. परंतु ज्या श्रद्धेने बाप्पाचे पूजन होते त्याच श्रद्धेने सेवा करण्यासाठी तरुणाईसमोर आली पाहिजे.