शहरात भुरट्या चोरट्यांचा हैदोस

By Admin | Updated: September 25, 2016 00:45 IST2016-09-25T00:45:22+5:302016-09-25T00:45:22+5:30

शहरात भुरट्या चोरटयांचा हैदोस वाढला असून २४ तासात शहरात चोरीच्या पाच घटना घडल्या आहेत.

Hades in the city of thieves | शहरात भुरट्या चोरट्यांचा हैदोस

शहरात भुरट्या चोरट्यांचा हैदोस

भंडारा : शहरात भुरट्या चोरटयांचा हैदोस वाढला असून २४ तासात शहरात चोरीच्या पाच घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे यापैकी भंडारा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. नूतन महाराष्ट्र शाळेच्या मागे राहणारे बडगे व कुळकर्णी यांच्या घरी भुरट्या चोरांनी शिरकाव करीत चोरीचा प्रयत्न केला. तसेच गणेशपुरातील आंबेडकर वॉर्डातील रहिवासी अनिल सुखदेवे यांच्या घरून दुचाकी चोरून नेली. दुचाकी क्रमांक एमएच ३६ यु ०१५९ असून त्याची किंमत ४० हजार रूपये आहे.
दुसरी घटना शहरातील बाबा मस्तान शहा वॉर्डातील पुजा बॅग दुकानासमोर घडली. यात रस्त्यार ठेवलेला ट्रक चोरांनी चोरून नेला. ट्रक क्रमांक एमएच ४०-५८६१ असून त्याची किंमत तीन लक्ष रूपये सांगण्यात येते. अब्दुल बाशीद शेख यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही घटनांचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.एम. रायपुरे करीत आहे.
विद्यानगर परिसरातही काल रात्री भुरट्या चोरांनी काही घरांमध्ये चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. खात रोड मार्गावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. म्हॉडा कॉलोनी परिसरात चोरीच्या अनेक घटना मागील वर्षभरात घडल्या आहेत. यामुळे भितीचे वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hades in the city of thieves