शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची लोकवर्गणीतून मुक्तता

By admin | Updated: July 19, 2014 23:45 IST

लोकसहभागाचे लोकाभिमुख धोरण स्वीकारून ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या भांडवली खर्चामध्ये १० लोकहिस्स्याची तरतूद केली होती. परंतु योजनांची किंमत बघता लोकवर्गणी भरणे ग्रामस्थांना अडचणीचे

किंमत : स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलासाभंडारा : लोकसहभागाचे लोकाभिमुख धोरण स्वीकारून ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या भांडवली खर्चामध्ये १० लोकहिस्स्याची तरतूद केली होती. परंतु योजनांची किंमत बघता लोकवर्गणी भरणे ग्रामस्थांना अडचणीचे ठरू लागल्याने राज्य शासनाने ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची लोकवर्गणी पूर्णत: रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलासा मिळाला आहे.गावस्तरावर कार्यान्वित होणाऱ्या पाणी पुरवठा योजनाबद्दल नागरिकांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी, माझी योजना माझी जबाबदारी म्हणून देखभाल दुरुस्ती गावस्तरावर व्हावी या उद्देशाने शासनाने मागणी आधारित लोकसहभाग धोरणानुसार योजनेच्या भांडवली खर्चात १० टक्के लोकहिस्स्याची तरतूद केली. योजनेची किंमत बघता ग्रामस्थांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकवर्गणी भरणे, जमा करणे अडचणीचे ठरू लागले. त्यामुळे लोकवर्गणीमध्ये विविध प्रकारे सवलत दिलेली आहे. योजनांसाठीच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत राज्यातील मंजूर निधी व गत काही वर्षातील मंजूर पाणी पुरवठा योजनांंचा विभागस्तरावर आढावा घेतला असता तीन वर्षापेक्षा अधिक कालावधीत रखडलेल्या योजनांपैकी बहुतांश योजना लोकवर्गणी अभावी व लोकवर्गणीशी निगडीत ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या प्रश्नांमुळे रखडल्याचे निदर्शनास आले. लोकवर्गणीच्या अटीमुळे योजना राबविल्यास विलंब होणे, केंद्र शासनाकडून प्राप्त होणारा निधी पर्याप्त प्रमाणात खर्च न होणे, योजना वेळेत पूर्ण होत नसल्याने योजनेची वाढणारी किंमत, योजनेवरील वाढणाऱ्या किमतीमुळे शासनावरील वाढणारा भार ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी आकारण्यात येणारी लोकवर्गणी पूर्णत: रद्द करण्यात आलेली आहे. लोकवर्गणीचे अट रद्द करण्यात आली असली तरी पाणी पुरवठा योजनांचे नियोजन अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती या तिन्ही टप्प्यांमध्ये शासनाचे लोकसहभागीय धोरण चालू राहणार आहे. सदर निर्णय बैठकीतील झालेल्या निर्णयापासून लागू करण्यात आलेला आहे. ज्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांकरिता, पूर्णत: अथवा अंशत: लोकवर्गणीची रक्कम जमा केलेली असेल तर ती जमा केलेली लोकवर्गणीची रक्कम संबंधित, स्थानिक स्वराज्य संस्थेस अथवा अंमलबजावणी यंत्रणेस परत केली जाणार नाही. तथापि अशा पाणी पुरवठा योजनांमधील उर्वरीत लोकवर्गणीची तरतूद पाणी पुरवठा योजनांच्या किमतीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. सुरुवातीचे तीन हप्ते ३० टक्के या प्रमाणे वितरीत करण्यात येतील तर शेवटचा चौथा हप्ता १० टक्के निधी योजनापूर्ण झाल्यावर पुढील एक वर्ष योजना यशस्वीरित्या चालविल्यानंतर अदा करण्यात येणार आहे. या विभागामार्फत ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या लोकवर्गणी संदर्भात लोकवर्गणीचा भार कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. शासनाच्या या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलासा मिळाला असून लोकवर्गणीची अट कायमस्वरुपी रद्द केल्यामुळे शासनाकडे अखर्चित असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून प्रलंबित पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण होवून ग्रामीण जनतेला कायमस्वरुपी पाणी पुरवठ्याच्या सोयी उपलब्ध होणार आहेत. (प्रतिनिधी)