शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन अडले

By admin | Updated: January 11, 2016 00:29 IST

ग्रामीण भागात ग्राम पंचायतमध्ये २४ तास सेवा दिले जात असताना कर्मचाऱ्यांना निर्धारीत कालावधीत वेतन दिले जात नाही.

२७ लाखांची थकबाकी : कुटुंबीयांवर उपासमारीची वेळचुल्हाड (सिहोरा) : ग्रामीण भागात ग्राम पंचायतमध्ये २४ तास सेवा दिले जात असताना कर्मचाऱ्यांना निर्धारीत कालावधीत वेतन दिले जात नाही. सिहोरा परिसरासह तुमसर तालुक्यातील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी असल्याने कर्मचाऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.तुमसर तालुक्यात ग्रामपंचायतमध्ये दीडशेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहे. अल्पशा मानधनावर त्यांचे उदरनिर्वाह सुरु आहे. या कर्मचाऱ्यांची गावात कामे करताना वेळ निश्चित नाही. अतिरिक्त वेळेत कार्य करताना त्यांचे भत्ते दिले जात नाही. गावकऱ्यांचे दाखले व कराची वसुली यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ग्रामसेवकांची अर्धेअधिक प्रशासकीय कामे कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. गावात आधी कोतवाल हे प्रशासकीय कामकाजात मदत करीत होते. परंतु आता त्यांची जबाबदारी कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर आली आहे. कामाचा भडीमार असताना वेतन मात्र अल्प आहे. शासन तथा ग्रामपंचायत या कर्मचाऱ्यांना वेतन देताना ५०-५० टक्केचा वाटा उचलत आहे. ५० टक्के अनुदान शासन देत असताना महिन्याकाठी ही राशी उपलब्ध करण्यात येत नाही. सहा ते सात महिने अनुदान प्राप्त होत नाही. तुमसर तालुक्यातील अंदाजे २७ लाखांचे देयके अडली आहे. यामुळे २०१५ या वर्षातील दिवाळी अंधारात गेली आहे. आता लग्नसराई डोक्यावर आहे. परंतु घरात छदामही नसल्याने चिंता वाढल्या आहे. वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे कनिष्ठांना सांगण्यात येत आहे. परंतु कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येत नाही. १३ जानेवारीला कर्मचारी पंचायत समिती आवारात आत्मदहन करणार आहेत. (वार्ताहर)