शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

शासन लवकरच व्यापारी हिताचा निर्णय घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 05:00 IST

काेराेनाचा नवा स्ट्रेन अधिक धाेकादायक असून, त्याची संक्रमणशक्ती तुलनेने जास्त आहे. याच कारणाने गेल्या वर्षीच्या तुलनेत काेराेना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. काेराेनाची ही साखळी ताेडण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश दिले. खाजगी रुग्णालयातील काेविड उपचाराचे दर नियंत्रणात ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मंगळवारपासून संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. व्यापाऱ्यांमध्ये असंताेष दिसत आहे.

ठळक मुद्देविश्वजित कदम : काेराेना आढावा बैठक

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘ब्रेक द चेन’मुळे व्यापार, उद्याेगात नाराजीचा सूर उमटत आहे. एक- दाेन दिवसांत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय हाेणार आहे. काेराेना साखळी ताेडण्यासाठी लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश पालकमंत्री डाॅ. विश्वजित कदम यांनी गुरुवारी येथे दिले. जिल्हा परिषद सभागृहात आयाेजित काेविड आढावा बैठकीत ते बाेलत हाेते. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भाेंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सचिन पानझाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. रियाज फारुखी, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके उपस्थित हाेते. काेराेनाचा नवा स्ट्रेन अधिक धाेकादायक असून, त्याची संक्रमणशक्ती तुलनेने जास्त आहे. याच कारणाने गेल्या वर्षीच्या तुलनेत काेराेना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. काेराेनाची ही साखळी ताेडण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश दिले. खाजगी रुग्णालयातील काेविड उपचाराचे दर नियंत्रणात ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मंगळवारपासून संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. व्यापाऱ्यांमध्ये असंताेष दिसत आहे. याबाबत बाेलताना पालकमंत्री डाॅ. विश्वजित कदम म्हणाले, उद्याेग, व्यापाऱ्यांबाबत एक- दाेन दिवसांत शासनस्तरावर सकारात्म्क निर्णय हाेणार आहे. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. रेमडेसिवीरचा काळाबाजार राेखण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. औषधी दुकानात वाजवीपेक्षा अधिक दराने रेमडेसिवीर विकले जात असून, आवश्यकता नसताना प्रिस्क्राइब केले जात असल्याची बाब खासदार सुनील मेंढे व आमदार नरेंद्र भाेंडेकर यांनी या बैठकीत उपस्थित केली हाेती. त्यावर पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कारवाईचे निर्देश दिले.

लस उपलब्ध हाेणारभंडारा जिल्ह्यात लसीकरणाचा वेग चांगला असून, जिल्हा सध्या अग्रस्थानी आहे. एक- दाेन दिवस पुरेल एवढेच डाेस शिल्लक असले तरी जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध हाेईल, अशी ग्वाही पालकमंत्री डाॅ. कदम यांनी दिली. याबाबत आपण आराेग्यमंत्री व विभागीय आयुक्तांशी बाेललाे असल्याचे त्यांनी सांगितले. पात्र लाभार्थ्यांनी कुठलीही शंका न घेता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.बेड व ऑक्सिजन उपलब्धभंडारा येथे आयसीयू व ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. सामान्य रुग्णालयात अतिरिक्त १४० बेडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयातही बेड निर्माण करण्यात आले आहेत. साेबत काेविड केअर सेंटरमध्येही बेड उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या बैठकीत दिली. काेविड केअर सेंटरमध्ये भाेजनाची उत्तम व्यवस्था असावी याकडे लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. दरम्यान, पालकमंत्र्यांनी सामान्य रुग्णालयातील काेविड लसीकरण केंद्राला भेट दिली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या