शासनाने उन्हाळी धानाची तात्काळ खरेदी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:00:39+5:30

चौरास भागात विहिरीच्या तसेच बोअरवेल पाण्यावर उन्हाळी धानाची लागवड केली जाते. सध्या उन्हाळी धानाचे पिक निघणे सुरु झालेले आहे. तसेच यावर्षी वीज भारनियमन कमी व अपेक्षीत जलसिंचनामुळे उन्हाळी भाताचे क्षेत्रात वाढ झाले आहे. विहिरींची पाण्याची पातळी चांगली असल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.

The government should buy summer grains immediately | शासनाने उन्हाळी धानाची तात्काळ खरेदी करावी

शासनाने उन्हाळी धानाची तात्काळ खरेदी करावी

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी । महामंडळाचे झाले दुर्लक्ष, धान विक्रीची समस्या कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र शासनाने खरीप धान खरेदी केल्याप्रमाणे मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून आधारभूत खरेदी केंद्र सुरु करुन उन्हाळी धानाची खरेदी लवकर करावी अशी मागणी चौरास परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.
त्यामुळे उन्हाळी धानाचे क्षेत्र तुलनेने कमी असले तरी चांगल्या धान उत्पादनामुळे शेतकऱ्यांकडे आजही मोठ्या प्रमाणात घरी धानाचा साठा करुन ठेवले आहे.
कोरोनाच्या परिस्थितीत धानाचे भाव वाढवून उन्हाळी धानाची खरेदी शासनाने त्वरीत करण्याची गरज आहे. बारीक धानाला १८०० ते २००० तर ठोकळ धानाला १२०० ते १४०० रुपये क्विंटल प्रामणे भाव मिळत असतो. यावर्षी बारीक धानाचे उत्पादन जास्त तर ठोकळ धानाचे उत्पादन फारच कमी आहे. उत्पादनाच्या मानाने लागवड खर्च अधीक आहे. त्यामुळे उन्हाळी धानाची खरेदी त्वरीत करावी अशी शेतकºयांची मागणी आहे.
खरीप हंगाम जवळ येऊन ठेपल्याने तालुक्यात अनेक शेतकरी खरीपाच्या कामामध्ये व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांनी शेतात नांगरणी, वखरणी धुरे पेटविणे कामांना सुरुवात केली आहे. शेतकरी आपल्या शेतात मशागतीच्या कामामध्ये व्यस्त असून खरीपासाठी बी बियाणे खरेदीची अनेक ठिकाणी लगबग सुरु असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामात धान उत्पादनाचा फटका बसला होता. रबी हंगामातही गहू, हरभरा पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने धान खरेदी केंदात वाढ करण्याची मागणी होत आहे.

गोडाऊन झाले फुल
जिल्ह्यात धानाचे लक्षणीय उत्पादन घेतले जात असताना शासनाकडून शेतकऱ्यांच्या धान खरेदीसाठी विशेष उपाययोजना राबविल्या जात नसल्याचा आरोप शेतकºयांतून होत आहे. अनेक ठिकाणी उन्हाळी धान खरेदीविना पडून आहे.

Web Title: The government should buy summer grains immediately

टॅग्स :Farmerशेतकरी