शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

‘देवा, यंदा तरी पावशील का!’

By admin | Updated: June 25, 2016 00:32 IST

जिल्ह्यात मागील चार ते पाच वर्षांचे अवलोकन केले असता निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

वखरणी, नांगरणीची कामे पूर्ण : बळीराजाच्या मनात धास्ती कायमचविशाल रणदिवे अड्याळजिल्ह्यात मागील चार ते पाच वर्षांचे अवलोकन केले असता निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यात शासकीय जाचात फसलेल्या शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट बळावले आहे. दरवर्षी येथील शेतकरी मोठ्या आशेने बियाणे पेरतो मात्र निसर्गचक्रासमोर तो हतबल ठरत आहे. देवा, यंदा तरी पावशील का? असा सवाल बळीराजा विचारीत आहे. ज्याअर्थी हवामान खात्याचा अंदाज चुकू शकतो तर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर, यंदा शेतकऱ्यांनी हवामान खात्याचा अंदाज पाहुन मोठ्या आनंदात शेतीची मशागत करायला सुरूवात केली. परंतु सद्यसिथतीची पाहणी केल्यावर बळीराजाच्या मनात धास्ती कायम आहे. निसर्गाचा लहरीपणा, हवामान खात्याचा चुकलेला अंदाज पाहुन यंदा शेती करावी की नाही हा गहन प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर उभा आहे. हे सर्व चित्र शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभे असतानाही मात्र यावर्षी जमीन कसल्यावर कर्जाचा भार कमी होईल, मुलामुलींच्या लग्नासाठी मदत होईल आदी हेतुनेच येथील शेतकरी जोमाने कामाला लागला आहे. आधी नक्षत्राच्या जोरावर शेतकरी शेतीची कामे पुर्ण करण्यावर भर असायचा . आता हवामान खात्याच्या माहितीवर शेतीची कामे अवलंबून आहेत. आधी बि-बियानांचा पाहिजे तेवढा बाजार नव्हता आताच्या घडीला पेरेल ते उगवेलच याची शास्वती नाही. दरवर्षी कुठे ना कुठे पेरले पण उगवले नसल्याची चर्चा रंगते पण त्या शेतकऱ्यांचे आर्थिक स्थितीत कंबरडे मोडते. आधीच अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करीत शेतकरी कसाबसा जीवन जगत आहे. त्यात दरवर्षी नवनवीन बियानांच्या नावावर कंपन्या शेतकऱ्यांची लुबाडणूक करून पैसे कमवित आहेत. याला कृषी विभागही जबाबदार असणार की नाही हाही एक प्रश्नच आहे. अड्याळमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडणारे असले तरी १२ वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती जे बंद झाली तरी अद्याप सुरू झालेली नाही. ही सत्यपरिस्थिती आहे. अड्याळमध्ये नेत्यांची कमी नाही असेही बाहेरचे म्हणतात. यंदा शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामे पूर्ण करून ठेवली आहेत. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी आधीच पण ज्यांच्याकडे सिंचन व्यवस्था नाही ते मात्र आजही एका पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळेच तर यंदा तरी निसर्गराजा बळीराजाला तारणार की मारणार, असा सवाल सर्वांनाच भेडसावत आहे.