शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनासाठी कालव्याचे पाणी द्या

By admin | Updated: August 28, 2016 00:23 IST

गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालाव्यातून पाणी वाहत असताना शेतातील पिकांना त्याचा उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला.

बाळा काशिवार यांचे निर्देश : हयगय करणाऱ्यांविरुद्ध होणार कारवाईलाखांदूर : गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालाव्यातून पाणी वाहत असताना शेतातील पिकांना त्याचा उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला. आ. बाळा काशिवार याांनी गोसे धरणाच्या अधिकाऱ्यांना गवराळा येथे बोलावून परिस्थिती समजून घेत अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारावर ताशेरे ओढले. तसेच सिंचनासाठी प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळालेच पाहिजे, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.संपूर्ण चौरास भागात डाव्या कालव्याचे जाळे पसरले आहे. अपुऱ्या पावसामुळे धानपीक करपू लागले अशातच गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यातुन पाणी सोडण्यात आले. मुख्य कालव्याला जोडून उप कालवे व गेटचे अर्धवट बांधकाम असल्याने शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळणे कठीण झाले. मिळेल त्या दिशेने गरज नसताना पाणी वाहून जात आहे. अशातच पाणी असून पाणी मिळत नसल्याने शेतकरी जाम वैतागले आहेत. याची आमदार काशिवार यांना देण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्याला प्राधान्य देत गवराळा गावाला भेट देत गोसे खुर्द धरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्या एकूण घेतल्या. यावेळी कालव्याचे पाणी शेतात येत नाही, उपकालव्याचे सदोष बांधकाम, विद्युत वितरण विभागाच्या चुकीचे धोरण, वीज जोडणीची विलंबता, नादुरूस्त जनित्र, अवेळी होणारे भारनियमन, वीज जोडणीसाठी अवाजवी डिमांड यातून योग्य मार्ग काढण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली. प्रत्यक्ष वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर बोलून कमी डिमांड भरून शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले. धानपीक करपणार नाही याची काळजी घेत सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना आ. बाळा काशिवार यांनी यावेळी दिल्या. जिल्हा परिषद सदस्य प्रणाली ठाकरे, सभापती मंगला बगमारे, नूतन कांबळे, विनोद ठाकरे, विलास तिघरे, प्रकाश राऊत, पंचायत समिती सदस्य अल्का मेश्राम, शिवाजी देशकर, प्रदीप बुराडे, प्रमोद ढोरे, तहसीलदार तोडसांम, खंडाविकास अधिकारी देवरे, गोसेखूर्द धरणाचे वरिष्ठ अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)