शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या घोषणेवरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांत रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:38 IST

शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळी तालुक्यात जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकºयात प्रचंड रोष दिसत आहे. धानपीकाची स्थिती दुष्काळी असताना शासनाने जिल्ह्याला का वगळले असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देभ्रमनिरास : एकाही तालुक्याचा समावेश नाही, दुष्काळसदृशमध्ये होते तीन तालुके

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळी तालुक्यात जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकºयात प्रचंड रोष दिसत आहे. धानपीकाची स्थिती दुष्काळी असताना शासनाने जिल्ह्याला का वगळले असा प्रश्न निर्माण झाला आहे.राज्यशासनाने १५१ तालुक्यांमध्ये गंभीर व मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला. त्यात भंडारा जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही. खरे पाहता भंडारा जिल्हा हा गत काही वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत आहे. यावर्षीही दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अपुºया पावसाने धानपीक हातचे गेले आहे. शासनाने सुरुवातीला दुष्काळसदृष्य तालुक्याच्या यादीत जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी आणि पवनी या तीन तालुक्यांचा समावेश केला होता. संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा अशी मागणी होती. त्यामुळे ३१ आॅक्टोबर रोजी होणाºया निर्णयाकडे जिल्ह्यातील सर्व शेतकºयांचे लक्ष लागले होते. परंतु यादीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नसल्याचे पाहून शेतकºयांचा भ्रमनिरास झाला.भंडारा हा जिल्हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. या पीकाला पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. परंतु यंदा सरासरीच्या ७७ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला. पाण्याची आवश्यकता असताना पाऊस च आला नाही. परिणामी शेकडो हेक्टवरील धानपीक करपले. शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषीत केले जाईल अशी अपेक्षा होती.परंतु आता यादीत एकाही तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकरी शासनाच्या विविध मदतीपासून वंचित राहणार आहे. शासनाने दुष्काळ घोषीत करण्याच्या यादीबाबत फेरविचार करून जिल्ह्यातील सर्व सातही तालुक्यांचा समावेश करावा अशी मागणी आहे.दुष्काळाची गरज असताना शासनाने शेतकºयांची क्रूर थट्टा चालविली आहे. यातून धान उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या वाटेवर जातील. शेतीपूरक दूध व्यवसायीकांचेही हाल आहेत. २० रुपये लिटर पाणी आणि १९ रुपये लिटर दूध अशी अवस्था आहे. शासनाने गांभीर्याने विचार केला नाही तर जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.-सुनील फुंडे, अध्यक्ष भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.शासनाने घोषीत केलेली दुष्काळग्रस्तांची यादी म्हणजे शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होय. जिल्ह्यात धानशेतीची गंभीर अवस्था असताना दुष्काळ घोषीत झाला नाही. सत्ताधारी पक्षाचे जिल्ह्यात तीनही आमदार असताना तेही गप्प आहेत.-नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार.

टॅग्स :Farmerशेतकरी