शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात ढोक दाम्पत्यावर अंत्यसंस्कार

By admin | Updated: September 1, 2016 00:44 IST

जादुटोण्याच्या संशयावरून दावेझरी टोला येथे ढोक दांपत्याची निर्घृण हत्या झाली होती. तीन दिवसानंतर त्यांच्या पार्थिवावर दावेझरी येथे पोलीस बंदोबस्तात

दावेझरीकडे पाठ : महानिरीक्षकांनी केली चौकशी समिती गठिततुमसर : जादुटोण्याच्या संशयावरून दावेझरी टोला येथे ढोक दांपत्याची निर्घृण हत्या झाली होती. तीन दिवसानंतर त्यांच्या पार्थिवावर दावेझरी येथे पोलीस बंदोबस्तात मंगळवारला सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत केवळ ढोक कुटुंबिय उपस्थित होते. पार्थिवासोबत यादवरावची दोन्ही मुले नागपूरहून आले. अंत्यसंस्कारानंतर दोघेही नागपुरला रवाना झाले. सध्या गावात सुरक्षेसाठी पोलीस नाही. यादवराव ढोक व त्यांची पत्नी कौसल यांनी जादूटोणा केल्यामुळे एक महिला व बालकाचा मृत्यू झाला असा समज करुन ग्रामस्थांनी ढोक दाम्पत्याला बेदम मारहाण केली. त्यांची निर्घृण हत्या काही लोकांनी रविवारी केली होती. त्यानंतर त्यांचे मृतदेह जंगलात फेकून दिले होते. दुसऱ्या दिवशी घटना उघडकीस आल्यानंतर १२ आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. त्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. दावेझरी टोला येथे पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी भेट देऊन ढोक दांपत्याच्या घराचे निरीक्षण करून घटनास्थळाची पाहणी केली. मंगळवारला सायंकाळी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. आदिवासी कुटुंबातील दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. गावातील महिला व एका बालकाचा मृत्यू कशाने झाला. याचे कारण अनुत्तरीत आहे. नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम यांनी बुधवारला तुमसर पोलीस ठाण्यात भेट देऊन खापा येथील दगडफेक आणि दावेझरी टोला येथील ढोक दाम्पत्याच्या हत्या प्रकरणाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू सोबत होत्या. पोलीस अधिकाऱ्यांची बैठकीत जादूटोणा प्रकरण गंभीर व संवेदनशिल असल्याने तपासाकरिता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक समिती तयार केली. हे प्रकरण कसे हाताळावे याची माहिती पोलिस महानिरीक्षकांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)