देणगी गोळा करून अनाथ तरुणावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:00 AM2020-05-24T05:00:00+5:302020-05-24T05:01:05+5:30

प्रवीण कोल्हे असे मृत पावलेल् या या २२ वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो जन्मत: मुका होता. आठ वर्षांचा असताना त्याची आई मरण पावली. तत्पूर्वी लहानपणीच त्याचे बाबांचे देहावसान झाले. अवघ्या आठ वर्षांचा असलेला प्रवीण अनाथ झाला. त्यानंतर शास्त्री नगर चौक हेच त्याचे निवासस्थान बनले. जे कुणी देईल ते खायचे किंवा कधी उपाशीपोट झोपायचे.

Funeral on orphan youth by collecting donations | देणगी गोळा करून अनाथ तरुणावर अंत्यसंस्कार

देणगी गोळा करून अनाथ तरुणावर अंत्यसंस्कार

Next
ठळक मुद्देशास्त्री चौकातील घटना, लहानपणीच हरपले होते आई-बाबांचे छत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रक्ताच्या नात्यालाही किंमत आजघडीला राहिली नसताना माणुसकीचे दर्शन शुक्रवारी घडले. अनाथ असलेल्या एका २२ वर्षीय तरुणाचा दीर्घ आजाराने निधन झाल्यानंतर नागरिकांनी देणगी गोळा करून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. इतकेच नव्हे तर धार्मीक पद्धतीने त्याच्या नावाने अन्नदानही करण्याचा हा प्रकार भंडारा शहराीतल शास्त्री चौकात पहायला मिळाला.
प्रवीण कोल्हे असे मृत पावलेल् या या २२ वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो जन्मत: मुका होता. आठ वर्षांचा असताना त्याची आई मरण पावली. तत्पूर्वी लहानपणीच त्याचे बाबांचे देहावसान झाले. अवघ्या आठ वर्षांचा असलेला प्रवीण अनाथ झाला. त्यानंतर शास्त्री नगर चौक हेच त्याचे निवासस्थान बनले. जे कुणी देईल ते खायचे किंवा कधी उपाशीपोट झोपायचे.
मात्र त्यानंतर येथील रहिवाशांनी त्याची ओळख झाल्यावर त्याची काळजी घेण्यात येत होती. त्याला लहाण पणापासूनच मिरगीचा आजार होता. त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न म्हणजे फुटपाथ दुकानदारांकडून दिलेले अन्न तो खायचा. कधी काळी येथील साखरकर सभागृहात किंवा परिसरात अन्य ठिकाणी होत असलेल्या सामाजिक कार्यक्रमात भाग घेऊन तो जेवण करीत असे.
प्रवीण अनाथ असल्याने शास्त्री चौकातील असलेल्या फुटपाथ संघटना व नागरिक त्याची काळजी घ्यायचे. आठ दिवसांपूर्वीच त्याला मिरगीचा दौरा पडला. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन ते चार दिवस उपचारानंतर पुन्हा तो परत आला.
दरम्यान तीन दिवसांपूर्वी त्याची प्रकृती पुन्हा बिघडली. नागरिकांच्या लक्षात येण्याच्या पूर्वीच शुक्रवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. अनाथ असल्याने अंत्येष्टी कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला.
मात्र शास्त्री चौकातील फुटपाथ संघटना व परिसरातील नागरिक एकत्र येऊन देणगी गोळा केली. हिंदू संस्कृती प्रमाणे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इतकेच नव्हे तर शनिवारी त्याच्या नावे ताट काढून लोकांना अन्नदानही करण्यात आले. यासाठी मुकुंद साखरकर, अंकुश कळंबे, वैशाली साखरकर, अख्तरमिर्झा बेग, जयराम ठोसरे, दलीराम नागापुरे, धनंजय समरीत, सोमा मदनकर, बंडू धुळसे, सतीष लांजेवार, कैलाश गोमासे, राजेंद्र भदाडे, देवेंद्र मुळे, कमलेश मेंढे, लोकेश साखरकर, संजय रहेले, गोलू ठाकरे, विनोद धुर्वे, विनोद लांजेवार, गणेश धुर्वे, अमीत हटवार, राहुल हटवार आदींनी सहकार्य केले.

माणूसकीचे दर्शन
येथील नागरिकांनी लहानपणापासून वास्तव्यास असलेल्या प्रवीणला नेहमी मदत केली. ऊन, वारा, पाऊस यापासून त्याचा बचाव व्हावा, याची काळजी घेऊन माणूसकीचे दर्शन घडविले. त्याच्या आजारावर अनेकांनी सढळ हाताने मदतही केली. उपचारानंतरही प्रवीणच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.

Web Title: Funeral on orphan youth by collecting donations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू